शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकवर वाघांचे फोटो व्हायरल करण्यास मनाई

By admin | Updated: June 19, 2017 17:57 IST

आता व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकवर वाघांचे फोटो व्हायरल करू नयेत, असे निर्देश व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रीय संचालकांना एनटीसीएने दिले आहेत.

गणेश वासनिक अमरावती : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या वाघांच्या छायाचित्रांमुळे त्यांचा अधिवास, जिविताला धोका निर्माण झाल्याचा निष्कर्ष राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने काढला (एनटीसीए) आहे. त्यामुळे आता व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकवर वाघांचे फोटो व्हायरल करू नयेत, असे निर्देश व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रीय संचालकांना एनटीसीएने दिले आहेत.केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने १७ जून २०१७ रोजी देशभरातील व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रसंचालकांना पाठविलेल्या पत्रात वाघांचे अधिवास धोक्यात आल्याची बाब स्पष्ट केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होणाऱ्या वाघांचे छायाचित्रांमुळे अधिवास, संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकवर वाघांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर ते छायाचित्र क्षणात विविध समूहांवर अपलोड होतात. त्यामुळे वाघ कोणत्या जंगलातील आहे, त्याचा अधिवास, संरक्षण आदींबाबतची माहिती सोशल मीडियातून प्रसारित होते. ही माहिती शिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर ते शिकारीसाठी सूक्ष्म नियोजन करून वाघांची शिकार करतात, असा अहवाल यापूर्वीच सीबीआयने तपासाअंती केंद्र सरकारला दिला आहे. परिणामी वन्यजीव क्षेत्रात कार्यरत एनजीओ तथा वनाधिकाऱ्यांनी वाघांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करू नयेत, असे निर्बंध एनटीसीएने लावले आहेत. वाघांचा अधिवास कुठे, जंगलाचे नाव, वर्णन आदी माहिती राखीव वनक्षेत्राबाहेर जाता कामा नये, ही बाब केंद्र सरकारने स्पष्ट केली आहे. तसेच वन्यजीव क्षेत्रात कार्यरत एनजीओंनी वरिष्ठ वनाधिकाऱ्यांची परवानगी न घेता राखीव जंगल, अभयारण्यात प्रवेश केल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी, अशा सूचना एनटीसीएच्या आहेत. सीबीआयने यापूर्वी विदर्भात वाघ शिकारीच्या घटनेनंतर तपासादरम्यान वाघांचे सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने जंगलातील माहिती ही शिकाऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला आहे. या आधारावरच एनटीसीएने सोशल मीडियावर वाघांचे छायाचित्र प्रसारित करण्यास मनाई केली आहे.वाघांचे प्रोफाईल गोपनीय ठेवाराष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या निर्देशांनुसार, वाघांचे प्रोफाईल, हिस्ट्री ही वन्यजीव विभागाला गोपनीय ठेवावी लागेल. वाघांचे वर्णन किंवा त्यांच्याविषयी माहिती सार्वत्रिक करता येणार नाही. वाघ कोठून आला, अधिवास, वय, वर्णन आदी बाबी यापुढे सार्वत्रिक होता कामा नये, असेही एनटीसीचे सहायक निरीक्षक डॉ. वैभव माथूर यांनी म्हटले आहे.वाघांचे छायाचित्र व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकवर व्हायरल होऊ नये, या एनटीसीएच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करू. एनजीओंच्या जंगल प्रवेशावरही निर्बंध लादले जातील.- एम.एस.रेड्डी,क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प