शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

राष्ट्रीय ‘रँकिंग’मध्ये ‘व्हीएनआयटी’ देशात ५७ व्या स्थानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 18:01 IST

Nagpur News केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क’ अंतर्गत देशभरातील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांचे ‘रँकिंग’ जाहीर करण्यात आले. यात यंदा नागपुरातील शैक्षणिक संस्था माघारल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देपहिल्या शंभरात नागपुरातील एकच शिक्षण संस्थानागपूर विद्यापीठ पहिल्या दीडशेत नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क’ अंतर्गत देशभरातील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांचे ‘रँकिंग’ जाहीर करण्यात आले. यात यंदा नागपुरातील शैक्षणिक संस्था माघारल्याचे दिसून आले. ‘व्हीएनआयटी’ (विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) सोडले तर नागपुरातील एकाही संस्थेला पहिल्या ६० मध्ये ‘रँकिंग’ मिळालेले नाही. ‘व्हीएनआयटी’चा सर्व संस्थांत देशात ५७ वा क्रमांक आहे. (VNIT is ranked 57th in the country in the national rankings)

अभियांत्रिकी संस्थांत ३० वा तर आर्किटेक्चर संस्थांत १७ वा क्रमांक आहे. मागील वर्षी ‘व्हीएनआयटी’ २७ व्या स्थानावर होते. ‘टॉप’ १०० विद्यापीठांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा कुठेही समावेश नसला तरी विद्यापीठाला सलग दुसऱ्यांदा पहिल्या दोनशे विद्यापीठांमध्ये ‘रँकिंग’ मिळाले आहे.

गुरुवारी जाहीर झालेल्या यादीत नागपुरातील सर्वच संस्था राष्ट्रीय पातळीवर माघारल्याचे दिसून आले. व्हीएनआयटी वगळता इतर एकाही अभियांत्रिकी महाविद्यालयाला पहिल्या १०० मध्ये स्थान मिळविता आलेले नाही. मागील वर्षी अभियांत्रिकी संस्थांच्याच यादीमध्ये ‘आरकेएनईसी’ (रामदेवबाबा कमला नेहरू इंजिनिअरिंग कॉलेज)११३ वा होता. यंदा हा क्रमांक ११९ इतका आहे. जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय (१३०), लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (१३६), यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय (१४९) यांना पहिल्या १५० मध्ये स्थान आहे. मध्य भारतातील शैक्षणिक हब म्हणून नागपूर शहर उदयाला येत आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय व फार्मसीमधील शैक्षणिक संस्थांची संख्या वाढली असली तरी दर्जा मात्र अद्याप हवा तसा सुधारलेला नाही, हेच या ‘रँकिंग’मधून स्पष्ट होत आहे.

‘फार्मसी’त पहिल्या शंभरात ३ संस्था

देशातील ‘टॉप’ फार्मसी महाविद्यालयांमध्ये नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील ‘श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी’ ला ४६ वे ‘रँकिंग’ मिळाले आहे. नागपूर विद्यापीठाचा पदव्युत्तर फार्मसी विभाग व दादासाहेब बालपांडे फार्मसी कॉलेज ५१ ते १०० या बॅन्डमध्ये आहेत.

नागपूर विद्यापीठाच्या पदरी परत निराशा

‘नॅक’चा ‘अ’ दर्जा मिळविणाऱ्या नागपूर विद्यापीठाला मात्र पहिल्या शंभरात ‘रँकिंग’ मिळविण्यात यश आलेले नाही. देशपातळीवर विद्यापीठ १५१ ते २०० या क्रमांकांमधील विद्यापीठांमध्ये आहे. राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ पहिल्या शंभरात स्थान मिळाले आहे.

आयआयएमच्या रँकमध्ये सुधारणा नाही

२०२० मध्ये आयआयएम-नागपूर व्यवस्थापन संस्थांच्या गटात ४० व्या क्रमांकावर होते. यंदादेखील तोच क्रमांक आहे. यंदा आयआयएमच्या रँकमध्ये सुधारणा झाली नाही. आयएमटीचा ७६ ते १०० या बँडमध्ये समावेश आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र