शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
2
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
3
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
4
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
5
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
6
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
7
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
8
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
9
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
10
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
11
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
12
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
13
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
14
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
15
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
16
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
17
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
18
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
19
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
20
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS

‘व्हीएनआयटी’ देशात ३१ व्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 10:53 IST

‘व्हीएनआयटी’ (विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) सोडले तर नागपुरातील एकाही संस्थेला अभियांत्रिकी गटात पहिल्या ३५ मध्ये ‘रॅन्किंग’ मिळालेले नाही. ‘व्हीएनआयटी’चा देशात ३१ वा क्रमांक आहे.

ठळक मुद्दे‘राष्ट्रीय रँन्किंग’मध्ये नागपूर विद्यापीठ यंदाही पहिल्या शंभरात नाही अभियांत्रिकी, फार्मसी, व्यवस्थापनात नागपुरातील आठ संस्था दीडशेच्या आत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रॅन्किंग फ्रेमवर्क’ अंतर्गत देशभरातील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांचे ‘रॅन्किंग’ जाहीर करण्यात आले. यात यंदा नागपुरातील शैक्षणिक संस्था माघारल्याचे दिसून आले. ‘व्हीएनआयटी’ (विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) सोडले तर नागपुरातील एकाही संस्थेला अभियांत्रिकी गटात पहिल्या ३५ मध्ये ‘रॅन्किंग’ मिळालेले नाही. ‘व्हीएनआयटी’चा देशात ३१ वा क्रमांक आहे. मागील वर्षीदेखील ‘व्हीएनआयटी’चा ३१ वाच क्रमांक होता. ‘टॉप’ १०० विद्यापीठांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा कुठेही समावेश नाही.देशातील विद्यापीठांचे तसेच विविध शैक्षणिक संस्थाचे ‘रॅन्किंग’ ठरविण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने प्रस्ताव मागविले होते. देशभरातील विविध विद्यापीठे व महाविद्यालयांनी हे प्रस्ताव जानेवारी महिन्यात सादर केले होते. नागपूर विद्यापीठ तसेच जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांचादेखील यात समावेश होता.सोमवारी जाहीर झालेल्या यादीत नागपुरातील सर्वच संस्था राष्ट्रीय पातळीवर माघारल्याचे दिसून आले. ‘व्हीएनआयटी’चा देशातील सर्वोत्तम अभियांत्रिकी संस्थांमध्ये ३१ वा क्रमांक आहे. इतर एकाही अभियांत्रिकी महाविद्यालयाला पहिल्या १०० मध्ये स्थान मिळविता आलेले नाही. अभियांत्रिकी संस्थांच्याच यादीमध्ये जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय व ‘आरकेएनईसी’ (रामदेवबाबा कमला नेहरु इंजिनिअरिंग कॉलेज) यांचा क्रमांक अनुक्रमे १११ व ११२ वा आहे. यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय १३४ व्या स्थानावर आहे. मध्य भारतातील शैक्षणिक हब म्हणून नागपूर शहर उदयाला येत आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय व फार्मसीमधील शैक्षणिक संस्थांची संख्या वाढली असली तरी दर्जा मात्र अद्याप हवा तसा सुधारलेला नाही, हेच या ‘रॅन्किंग’मधून स्पष्ट होत आहे. नागपूर विद्यापीठद्वारे संचालित लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचा १२२ वा क्रमांक आहे. व्यवस्थापन महाविद्यालय गटात इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीचे ‘रॅन्किंग’ ७० इतके आहे.

‘फार्मसी’मध्ये विद्यापीठाची प्रगतीविद्यापीठांच्या ‘रॅन्किंग’मध्ये नागपूर विद्यापीठ पहिल्या शंभरात नसले तरी ‘फार्मसी’त नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर फार्मसी विभागाला २९ वे ‘रॅन्किंग’ मिळाले आहे. मागील वर्षी विभाग ७४ व्या स्थानावर होता.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र