शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

विवेकानंदांच्या विचारातील शिक्षण पद्धती हवी

By admin | Updated: October 11, 2015 03:13 IST

सांस्कृतिक राष्ट्रवाद हा आमचा आधार आहे. आम्हाला मॉडर्नाइज व्हायचे आहे पण वेस्टर्नाइज नाही.

नितीन गडकरी यांचे मत : अ.भा. शैक्षिकमहासंघाचे अधिवेशननागपूर: सांस्कृतिक राष्ट्रवाद हा आमचा आधार आहे. आम्हाला मॉडर्नाइज व्हायचे आहे पण वेस्टर्नाइज नाही. स्वामी विवेकानंद यांचे विचार स्वीकारून आपण देशातील शिक्षण पद्धती पुढे नेली भारत जगात नंबर एक होईल, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. रेशीमबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय शैक्षिक महासंघाच्या त्रैवार्षिक सहाव्या राष्ट्रीय अधिवेशनात शनिवारी गडकरी बोलत होते. अध्यक्षस्थानी अ.भा. राष्ट्रीय शैैक्षिक महासंघाचे अध्यक्ष डॉ. विमलप्रसाद अग्रवाल होते. प्रमुख अतिथी म्हणून स्वामी रामकृष्ण मिशन विवेकानंद विद्यापीठाचे कुलगुरू स्वामी आत्मप्रियानंद, संयोजक प्रभुजी देशपांडे, शैक्षणिक फाऊंडेशनचे संरक्षक प्रो. के. नरहरी, महामंत्री प्रो. जे.पी. सिंघेल उपस्थित होते.यावेळी गडकरी म्हणाले, १९४७ च्या काळात कम्युनिस्ट होणे म्हणजे गौरवशाली मानले जात होते. त्यापूर्वी देशात अनेक विचारधारांवर काम करणारे लोक होते. त्यावेळी पंडित नेहरूंनी सोशलिस्ट- कम्युनिस्ट मॉडेल स्वीकारले व तसेच शैक्षणिक धोरणही अंगीकारले.काही प्रमाणात ब्रिटिश राजवटीचाही शिक्षण पद्धतीवर पगडा राहिला. त्याचे परिणामही पहायला मिळाले. आता जगभरातील समाजवादी विचारधारा संपण्याच्या मार्गावर आहे. हंगेरी कम्युनिस्ट देश होता. एकेकाळी तेथे चौकाचौकात कम्युनिस्ट नेत्यांचे पुतळे लावले होते. आता मात्र सर्व पुतळे तोडून एका संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत. रशियातही कम्युनिस्ट राहिले नाहीत. चीनमध्येही लाल बावटा सोडले तर कम्युनिस्ट विचारधारा दिसत नाही. आम्ही भारतीय सांस्कृतिक राष्ट्रवादी विचारधारा मानतो. कुणीही माणूस जात, धर्म, पंथ, भाषा, लिंग यावरून मोठा ठरू शकत नाही. तो गुणवत्तेनेच मोठा ठरतो. आम्ही सामाजिक न्याय व समतेचे तत्त्व स्वीकारले आहे. त्यामुळे भारतीय वारसावर आधारित शिक्षण पद्धती आवश्यक आहे, असेही गडकरी म्हणाले. कट्टरवादापासून देशाला धोका आहे. आम्ही संकुचित नाही. आमचाच धर्म श्रेष्ठ आहे, असे आम्ही सांगत नाही. शिवाजी महाराज आमचे आदर्श आहेत. हिंदू राजांनी कधी मशिदी तोडल्या नाहीत. मात्र, अनेक देशात लोक श्रेष्ठत्वातून मंदिरे तोडत आहेत, यावर त्यांनी चिंता व्यक्त केली.(प्रतिनिधी)