शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

शिवचरित्रातूनच विवेक जागृत होतो

By admin | Updated: February 20, 2016 03:30 IST

व्यक्तीपूजन करताना समाज एखाद्या विशिष्ट मार्गाकडे वेगाने प्रवाहित होतो. पण त्यात विचार नसतो आणि विवेकबुद्धीने विचार केला जात नाही.

दिलीप चौधरी : मराठा सेवा संघातर्फे शिवजयंती उत्सवनागपूर : व्यक्तीपूजन करताना समाज एखाद्या विशिष्ट मार्गाकडे वेगाने प्रवाहित होतो. पण त्यात विचार नसतो आणि विवेकबुद्धीने विचार केला जात नाही. ज्यावेळी आपल्या हाती धुपाटणेच राहते त्यावेळी मात्र आपण फसविले गेल्याचे लक्षात येते. तथाकथित व्यवस्था माणसांच्या मेंदूचा ताबा घेते आणि विवेकाने विचार करण्याची वृत्ती थांबविली जाते. शिवचरित्र मात्र आपल्याला डोळस करते आणि आपला विवेक जागृत करते. त्यामुळेच आजच्या काळातही शिवचरित्र अभ्यासण्याची गरज ३५० वर्षानंतर वाटते आहे, असे मत शिवसंस्कृतीचे अभ्यासक प्रा. दिलीप चौधरी यांनी व्यक्त केले. मराठा सेवा संघाच्यावतीने शिवजयंतीनिमित्त एका महोत्सवाचे आयोजन मराठा सेवा संघ लॉन, सुर्वेनगर येथे केले. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून चौधरी ‘बदलत्या परिस्थितीत शिवचरित्राची भूमिका’ विषयावर बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे प्रदेश महासचिव मधुकर मेहकरे तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अशोक अरबट, डॉ. निकुंज पवार, उत्तमराव सुळके, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. पी. जी. येवले, श्रीमंत कोकाटे, प्रभाकर देशमुख, आ. सुनील केदार, अविनाश काकडे, प्रफुल्ल गुडधे, पुरुषोत्तम कडू, दिनेश ठाकरे, रामकृष्ण ठेंगडी, अनिता वानखेडे, जमाते इस्लामीचे अध्यक्ष उमरखान, गिरधर मरडिया, उमेशबाबू चौबे उपस्थित होते. दिलीप चौधरी म्हणाले, महाराजांनी उपयोगात आणलेली शस्त्रे आता संग्रहालयात असली तरी त्यांचे विचार मात्र सार्वत्रिक आहेत. आजच्या अनेक प्रश्नांची उत्तरे शिवचरित्रातून सापडतात. आपण इतिहासाची शिकवण विसरलो त्यामुळेच अनेक नवे प्रश्न निर्माण होत आहेत. शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिताना मात्र जाणीवपूर्वक बहुजनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करताना इतिहास चुकीचा लिहिला गेला. लोकशाही सरकारच्या निर्णयावर उद्योजकांचा प्रभाव वाढतो आहे. अशा वेळी शिवचरित्रातून आपला विवेक आणि सद्बुद्धी जागृत होते, असे सांगताना त्यांनी काही उदाहरणांनी हा विषय समजावून सांगितला. अविनाश काकडे म्हणाले, संभाजीला औरंगजेबाने मनुस्मृतीप्रमाणे शिक्षा दिली. त्याला मनुस्मृती माहीत नव्हती. मुस्लिमांचा कर्दनकाळ अशी शिवाजींची प्रतिमा करण्यात आली पण त्यात तथ्य नाही. श्रीमंत कोकाटे म्हणाले, महाराजांनी रयतेचे राज्य केले. ते बुद्धिप्रामाण्यवादी होते. त्यांचा लढा मुस्लिमांविरुद्ध नव्हताच. दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदास त्यांचे गुरु नव्हते. पण जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास आपल्यावर लादला गेला. त्यांच्या अनुयायांवर नियंत्रण मिळविण्यासाठी हा घाट घातला गेला. शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने अर्थपुरवठा केला होता. त्यामुळेच त्यांच्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडल्या नाहीत. शासनानेही महाराजांची अर्थव्यवस्था तपासून पाहण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन निंबाळकर आणि सविता कराळ यांनी केले. प्रास्ताविक विनोद खोडके यांनी केले. प्रारंभी आदित्य लोहे यांनी ‘सह्याद्रीचा छावा’ हा एकपात्री प्रयोग सादर केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद वैद्य, विजय बेले, प्रशांत कोहळे, अशोक डहाके, अभिजित दळवी, नितीन ठवकर, श्याम डहाके आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)