नागपूर : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात भेट घेतली. बाबरी मशीद प्रकरणात लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासह भाजपा व संघ परिवाराशी संबंधित एकूण १३ नेत्यांविरुद्ध कटकारस्थान रचल्याचा आरोप ठेवून खटला चालविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला होता. या पार्श्वभूमीवर जोशी यांची ही भेट महत्त्वाची मानण्यात येत आहे. ही भेट गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. (प्रतिनिधी)
मुरली मनोहर जोशी, मोहन भागवत यांची भेट
By admin | Updated: April 23, 2017 01:22 IST