शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
Operation Sindoor Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार
3
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
4
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
5
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
6
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
7
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
8
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
9
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
10
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
11
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
12
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
13
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
14
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
15
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
16
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
17
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
18
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
19
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
20
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा

विदर्भवादी आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:11 IST

नागपूर : वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती, कोरोनाकाळातील वीज बिल माफी आणि इंधन व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ विदर्भवाद्यांनी पुकारलेल्या रास्ता ...

नागपूर : वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती, कोरोनाकाळातील वीज बिल माफी आणि इंधन व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ विदर्भवाद्यांनी पुकारलेल्या रास्ता रोको-जेल भरो आंदोलनात गुरुवारी पोलीस आणि आंदोलकांमध्ये प्रचंड धुमश्चक्री उडाली. सुमारे अर्धा तास चाललेल्या या आंदोलनात पुरुषांसह महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर आडवे पडून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस अडविल्या. बसची चावी हिसकावून बसेस बंद पाडल्या. पोलिसांनी फरफटत नेऊन आणि उचलून कार्यकर्त्यांना वाहनात कोंबून ताब्यात घेतले.

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पुढाकारात राम नेवले व प्रदेश युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर यांच्या नेतृत्वामध्ये गणेशपेठ बसस्थानक चौकात हे आंदोलन झाले. सुमारे साडेबारा वाजताच्या सुमारास घोषणाबाजी करत आंदोलनकांनी रस्ता अडवून धरला. प्रवेशद्वाराजवळ मार्गावर बसपुढे आडवे पडून कार्यकर्ते व महिलांनी बसेसचा मार्ग अडवून धरला. पोलिसांनी आंदोलकांचे हातपाय धरून उचलून व्हॅनमध्ये कोंबले. मुकेश मासुरकर यांनी चालकाकडून बसची चावी हिसकावून घेतली. यामुळे बराच वेळपर्यंत बस थांबून होती. राम नेवले व मुकेश मासुरकर यांना अटक करून वाहनात कोंबल्यावर महिला पदाधिकारी ज्योती खांडेकर, सुनिता येरणे, रेखा निमजे, जया चातुरकर, वीणा भोयर, शोभा येवले, उषा लांबट, संगीता अंबारे यांनी बससमोर आडवे पडून मार्ग रोखला.

सुमारे अर्धा तासपर्यंत ही पकडापकडी, कोंबाकोंबी आणि घोषणाबाजी सुरू होती. सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना पकडून नेल्यानंतर रस्ता सुरू झाला. पुन्हा काही वेळाने दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी येऊन रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी या सर्वांना हुसकावून लावले. अटकेतील कार्यकर्त्यांना टाकळी पोलीस मुख्यालय येथे नेण्यात आले. भादंविच्या कलम १८८, २६९, ३४१, ३५ कलमानुसार कारवाई करून सायंकाळी सुटका केली.

...

आंदोलकांवर दंडुकेशाही : येवले यांचा आरोप

आंदोलकांवर पोलिसांनी दंडुकेशाही केल्याचा आरोप राम नेवले यांनी निषेध नोंदविला आहे. ज्योती खांडेकर यांना उचलून गाडीत कोंबत असताना डोक्याला मार लागला, पोलिसांनी महिला आंदोलकांच्या अस्ताव्यस्त कपड्याचीही पर्वा केली नाही, असा आरोप त्यांनी केला.

...