शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील खासगी रुग्णालयात नियमांची पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 22:32 IST

कोविड-१९ आजाराच्या उपचारासह इतर आजारांच्या उपचाराचे दर राज्य शासनाने निर्धारित केले आहेत. मात्र शहरातील बहुतेक रुग्णालयात या नियमाचे पालन होताना दिसत नाही. विशेष म्हणजे कोविड उपचाराबाबत अधिकृत परवानगी दिलेल्या खासगी रुग्णालयातही नियमांचे उल्लंघन होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ आजाराच्या उपचारासह इतर आजारांच्या उपचाराचे दर राज्य शासनाने निर्धारित केले आहेत. मात्र शहरातील बहुतेक रुग्णालयात या नियमाचे पालन होताना दिसत नाही. विशेष म्हणजे कोविड उपचाराबाबत अधिकृत परवानगी दिलेल्या खासगी रुग्णालयातही नियमांचे उल्लंघन होत आहे. रुग्णांकडून वाजवीपेक्षा अधिक दर वसूल करण्याच्या प्रकरणात सेवन स्टार रुग्णालय व वोक्हार्ट रुग्णालयावर महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. शिवाय खासगी रुग्णालयांवर लक्ष असल्याचेही मनपाने वारंवार सांगितले आहे. असे असूनही नियमांचे पालन करण्यात रुग्णालये टाळाटाळ करीत आहेत.मनपाच्या विशेष पथकाने संबंधित रुग्णालयांवर कारवाई केली तेव्हा त्यांच्या दर्शनी भागात असे कुठलेही दरपत्रक लावलेले आढळून आले नाही. दोन्ही रुग्णालयांना रुग्णांकडून अधिकचे शुल्क वसुलणे व नियमांची पायमल्ली करण्याच्या प्रकरणात दोषी ठरविले आहे. त्यामुळे दोन्ही रुग्णालयांना रुग्णांकडून वसूल केलेले अतिरिक्त शुल्क तात्काळ परत करण्याचे निर्देश मनपाकडून देण्यात आले. जाणकारांच्या मते सध्या महापालिकेद्वारे कोविड रुग्णांचा उपचार करणाऱ्या अधिकृत रुग्णालयांची तपासणी केली जात आहे. मात्र उर्वरित रुग्णालयांमध्ये रुग्णांची लूट केली जात आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यापूर्वीच रुग्णालयांना नियमांचे पालन करा, अन्यथा कारवाईस तयार रहा, असा इशारा दिला आहे.रद्द होऊ शकतो परवानारुग्णालयांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरोधात महामारी कायदा, आपत्ती निवारण कायदा, मुंबई नर्सिंग अ‍ॅक्ट आदी कायद्यांच्या अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. अधिक मनमानी केल्यास रुग्णालयांचा परवानाच रद्द केला जाऊ शकतो. हे आहेत नियम- खासगी रुग्णालये ८० टक्के बेडवर सरकारने निर्धारित केलेल्या दरानुसार शुल्क वसूल करू शकतील. उर्वरीत २० टक्के बेडवर रुग्णालये स्वत:चा दर लावू शकतील.- कोविड रुग्णांचा उपचार प्रशासनाने नेमलेल्या रुग्णालयातच केला जाईल. जेवढे बेड निर्धारित करण्यात आले, त्यापैकी ८० टक्के बेडवर सरकारी दराने उपचार करणे बंधनकारक असेल.- रुग्णालयाच्या दर्शनी भागात उपचाराचे दरपत्रक लावणे बंधनकारक आहे. शिवाय दाखल रुग्णांची माहिती देणेही आवश्यक आहे.- नियमानुसार मनपा प्रशासनाने नियुक्त केलेले पथक कधीही रुग्णालयांचे आकस्मिक निरीक्षण करू शकतील.- अतिरिक्त शुल्क वसूल केल्याची तक्रार रुग्ण किंवा नातेवाईकांनी केल्यास रुग्णालयांविरोधात कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेला असतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल