शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या दहशतीमुळे गावकरी टाळताहेत कृषी अधिकाऱ्यांच्या भेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 11:06 IST

नागपुरात मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा गावकऱ्यांनी धसका घेतला आहे. त्यामुळे बहुतेक गावकरी नागपूरकरांशी संपर्क टाळत आहेत. त्याचा फटका कृषी विभागाच्या खरीप पूर्वतयारीला बसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा गावकऱ्यांनी धसका घेतला आहे. त्यामुळे बहुतेक गावकरीनागपूरकरांशी संपर्क टाळत आहेत. त्याचा फटका कृषी विभागाच्या खरीप पूर्वतयारीला बसत आहे. परिणामत: ऐन खरीपाच्या तोंडावरच या तयारीला ब्रेक लागत असल्याचे चित्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात निर्माण झाले आहे.नागपुरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. माध्यमांमधून ही माहिती गावकऱ्यांपर्यंत पोहचत असून, ते स्वत:ला अधिकाधिक जपण्याचा प्रयत्न करीत आहेत. अलीकडेच खरीपाच्या नियोजनाची बैठक झाली. त्या नियोजनानुसार कृषी अधिकारी गावकऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र गावकरी त्यांच्या भेटी टाळत असल्याचे चित्र आहे. या काळामध्ये गावकरी अधिक दक्ष झाले आहेत. बाहेरून वाहनांद्वारे कुणी येऊ नये यासाठी काही गावकऱ्यांनी गावांमध्ये येणारे मार्ग बंद करून ठेवले आहेत. अनेक गावांमध्ये दक्षता समित्या स्थापन करून बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना प्रवेश नाकारला जात आहे.सध्याचा काळ खरीप पूर्वतयारीचा आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने तयारी पूर्ण करून ठेवली आहे. मात्र कोरोनामुळे कार्यालयातील उपस्थितीवर परिणाम पडला आहे. शासनाच्या आदेशानुसार कार्यालयांमध्ये ५ ते १० टक्के उपस्थिती असल्याने फिल्डवर पोहचणे अशक्य होत आहे. वाहतुकीच्या साधनांचीही अडचण आहे. परिणामत: खरीपाच्या पूर्वतयारीसाठी गावकऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधणे अडचणीचे ठरत आहे.ग्रामस्तरीय कमिट्यांना योजनांची लिंकतोंडावर आलेल्या खरीपाच्या कामात अडथळा येऊ नये यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी योजनांच्या माहितीची लिंक ग्रामस्तरीय कमिट्यांना पाठविणे सुरू केले आहे. त्या माध्यमातून कमिट्यांमधील सदस्यांनी गावकऱ्यांना योजनांची माहिती द्यावी, असे आवाहन केले जात आहे. मात्र त्यातही काही गावांमध्ये नेटवर्कच्या तांत्रिक अडचणी आहेत तर काही ठिकाणी ही तांत्रिक माहिती गावकºयांना पटवून सांगण्यात सदस्य कमी पडत आहेत....

 

टॅग्स :agricultureशेती