शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

विकास ठाकरे यांचा राजीनामा फेटाळला

By admin | Updated: March 1, 2017 02:18 IST

महापालिका निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळालेले नाही. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून नागपूर

नागपूर : महापालिका निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळालेले नाही. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी दिलेला पदाचा राजीनामा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी फेटाळला आहे. मंगळवारी चव्हाण यांनी विकास ठाकरे यांना राजीनामा मान्य नसल्याची महिती दिली. तसेच काँग्रेसच्या नगरसेवकांची बुधवारी देवडिया काँग्रेस भवन येथे बैठक आयोजित करून, महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, विकास ठाकरे यांनीही अशोक चव्हाण यांनी राजीनामा फेटाळल्याला दुजोरा दिला आहे.(प्रतिनिधी) शहर काँग्रेसचाही ठराव निवडणुकीतील पराभवाला विकास ठाकरे जबाबदार नाहीत. त्यामुळे त्यांचा राजीनामा मंजूर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काँग्रेसच्या पराभवाला जबाबदार असलेल्या नेत्यांवर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचा ठराव सर्व संमतीने पारित करण्यात आला. बैठकीला शहर कार्यकारिणीचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते. यात पदाधिकारी डॉ. गजराज हटेवार, निर्मला बोरकर, जयंत लुटे, प्रा. दिनेश बानाबाकोडे, अ‍ॅड. अक्षय समर्थ, अण्णाजी राऊ त, राजू व्यास, कृष्णा गोटाफोडे, रत्नाकर जयपूरकर, विजय इंगोले, इफ्तेखार अन्सारी, इरशाद मलिक, शिवनाथ शेंडे, रितेश बोरकर, हरीश खंडाईत, भास्कर चाफले, सदन यादव, चंदू वाकोडकर, शत्रुघ्न महतो, राजेश कुंभलकर, वंदना रोटकर, आप्पासाहेब मोहिते, अशोक वानखेडे, अनिता ठेंगरे, अर्चना बडोले, आशिष वारजूरकर, लोकेश बरडिया, रिंकू जैन, राजाभाऊ चिलाटे, विजय कदम, राम गोविंद, राजेश कडू, प्रभाकर खापरे आदी उपस्थित होते.