शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

कायदा करून राज्य सरकारचे अधिकार निवडणूक आयोगाकडून परत घेणार : विजय वडेट्टीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2022 18:48 IST

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबद्दल आपण जो कायदा करतो आहे, त्या प्रक्रियेला सहा महिने लागणार आहेत. त्यामुळे, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सहा महिने तरी लांबतील, असे वडेट्टीवार म्हणाले.

नागपूर : घटनेच्या कलम २४३ ई मध्ये सहा महिन्यांपर्यंत वॉर्ड फॉर्मेशनसाठी निवडणुका टाळता येऊ शकतात. आता आपण जो कायदा करतो आहे, त्यामुळे नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुकांसाठी सहा महिने तरी लागतील, असे राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. 

ते आज नागपुरात माध्यमांशी बोलत होते. ओबीसी आरक्षणासंदर्भात आधी राज्य सरकारला अधिकार होते. त्यामुळे राज्य सरकार वार्ड संरचना किंवा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याची भूमिका पार पाडत होते. नंतरच्या काळात ती जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाकडे देण्यात आली. आता आम्ही ओबीसींसदर्भात कायदा करून ते अधिकार पुन्हा राज्य सरकारकडे घेण्याचा निर्णय करतो आहोत. असा कायदा झाल्यास वार्ड संरचना करणे, निवडणुकांची तारखा जाहीर करणे हे अधिकार राज्य सरकारला मिळतील ते फायद्याचे ठरेल, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.

अधिवेशन सुरू असल्याने हा कायदा सोमवारी चर्चेसाठी आणला जाण्याची शक्यता आहे. कॅबिनेटने त्याला अगोदरच मान्यता दिलेली आहे. त्यामुळे, विधिमंडळाच्या मान्यतेनंतर तो कायदा राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर लगेच अमलात येऊ शकतो. या संदर्भात आम्ही विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना ही विश्वासात घेऊ. आधीही ओबीसी आरक्षणासंदर्भात त्यांचे सहकार्य घेतले आहे. यासंदर्भातही आम्ही त्यांच्याशी चर्चा करु, असे वडेट्टीवार म्हणाले.

या कायद्याचा आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलेल्या ट्रिपल टेस्टचा मुद्दा वेग-वेगळा आहे. कायदा करून आम्ही राज्य सरकारचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडून परत घेणार आहोत. देशात इतर राज्याचे प्रकरण टिकत असेल तर, महाराष्ट्राचेही टिकेल. आता मध्यप्रदेशच्या धर्तीवर आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न केले जातील. जर मध्यप्रदेशाचे प्रकरण टिकत असेत तर आमचेही प्रकरण सुप्रीम कोर्टात टिकले पाहिजे, अशी आमची आशा असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. 

टॅग्स :PoliticsराजकारणOBCअन्य मागासवर्गीय जातीVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारOBC Reservationओबीसी आरक्षण