शहरं
Join us  
Trending Stories
1
Porsche Car Accident: 'बाळा'च्या ब्लड सँपलची ससून रुग्णालयात अदलाबदल; ते खासगी इसम कोण?
2
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
3
सांगवीत भररस्त्यात गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून 
4
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
5
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
6
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
7
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
8
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
9
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
10
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
11
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
12
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
13
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
14
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
15
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
16
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
17
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
18
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
19
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
20
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा

विजय दर्डा यांनी घेतली शरद पवारांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 10:29 AM

राज्यात सत्तास्थापनेची राजकीय कोंडी अद्यापही कायम असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार गुरुवारपासून विदर्भ दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी पवार यांची भेट घेतली.

ठळक मुद्देशेतकरी समस्या, राजकीय परिस्थितीवर चर्र्चाशेतकऱ्यांना तत्काळ मदत आवश्यक असल्याची पवारांची भावना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात सत्तास्थापनेची राजकीय कोंडी अद्यापही कायम असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार गुरुवारपासून विदर्भ दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शेतकरी समस्या तसेच वर्तमान राजकीय स्थिती याबाबत दोघांमध्येही बंदद्वार चर्चा झाली.सकाळी पावणेनऊच्या सुमारास दर्डा यांनी पवार यांची वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये भेट घेतली. व्यस्त वेळापत्रक असतानादेखील पवार यांनी दर्डा यांच्याशी बराच वेळ चर्चा केली. या भेटीदरम्यान दर्डा यांनी अकाली पावसामुळे खराब झालेली फळे बॉक्समध्ये देऊन पवार यांना समस्येची गंभीरता लक्षात आणून दिली. यावेळी गुरुवारी केलेल्या दौऱ्याबाबत पवार यांनी भावना व्यक्त केल्या. तर विदभार्तील शेतकऱ्यांचे अस्मानी संकटामुळे कंबरडे मोडले असून त्याला त्वरित आधाराची गरज असल्याचे प्रतिपादन दर्डा यांनी केले. या बैठकीत राजकीय मुद्द्यांवर काय चर्चा झाली यासंदर्भात दर्डा यांना विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.शेतकऱ्यांना लगेच मदत देणारी व्यवस्था हवी : पवारशेतकऱ्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा हवा. त्यांच्या मालाला भाव मिळायला हवा व अस्मानी संकट आल्यावर लगेच आर्थिक मदत मिळायची व्यवस्था हवी, असे मत यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारVijay Dardaविजय दर्डा