शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यांमध्ये आता उपविभागीय स्तरावरही दक्षता समिती ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:09 IST

- विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम ...

- विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कायद्यांतर्गत जिल्हास्तरावर घडलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन पीडितांना तातडीने लाभ व न्याय मिळावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा स्तरासोबतच उपविभागीय स्तरावर देखील दक्षता व नियंत्रण समिती स्थापन करा, असे निर्देश विभागीय दक्षता व नियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज येथे दिले. या समितीची दरमहा बैठक घेऊन हा अहवाल विभागस्तरीय समितीला सादर करावा. तसेच अत्याचार पीडितांना त्वरित शासकीय मदत प्राप्त व्हावी यासाठी त्यांना शासकीय नोकरीत बिंदूनामावलीनुसार सामावून घेण्यात यावे. खून, मृत्यू प्रकरणे तसेच कायम अपंगत्व आले असल्यास त्यांना नोकरी व निवृत्तिवेतन, पुनर्वसन आदी सोयी उपलब्ध करून देण्यासाठी शासन निर्णयान्वये तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

नागपूर विभागाची दक्षता व नियंत्रण समितीची सभा विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, संदीप कदम (भंडारा), दीपककुमार मीना (गोंदिया), अजय गुल्हाने (चंद्रपूर), दीपक सिंगला (गडचिरोली), प्रेरणा देशभ्रतार (वर्धा), नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, वर्धेचे डॉ. सचिन ओम्बासे, चंद्रपूरचे राहुल कर्डिले, भंडाऱ्याचे विनय मून तसेच उपायुक्त श्रीकांत फडके, धनंजय सुटे, आशा पठाण, विभागीय दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य सचिव तथा समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड आदी उपस्थित होते.

बॉक्स

४१८ प्रकरणे प्रलंबित, ३६५ जणांना लाभ

नागपूर विभागात ॲट्रॉसिटीअंतर्गत खून, बलात्कार तसेच इतर गुन्ह्यांबाबत लाभ देण्यात आलेल्या गुन्ह्यांपैकी एकूण ४१८ प्रकरणे पुनर्वसनासाठी प्रलंबित आहेत. त्यापैकी ३६५ व्यक्तींना लाभ देण्यात आलेला आहे. ॲट्रॉसिटीअंतर्गत ६२ खून व १ मृत्यू अशा ६३ जणांना शासकीय नोकरी देण्याबाबतच्या कार्यवाहीवरही यावेळी चर्चा झाली.