लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी येथे पार पडलेल्या १३२ व्या तुकडीच्या दीक्षांत पथसंचलनात क्षितिज दीपक लिमसे एनडीएमधून उत्तीर्ण झाला आहे. एनडीएच्या या तुकडीत ३०४ प्रशिक्षणार्थ्यांपैकी विदर्भातील एकमेव असलेल्या क्षितिज लिमसेला भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांच्या हस्ते पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. नागपूर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी दीपक लिमसे यांचा क्षितिज मुलगा आहे.विदर्भातील युवकांनी लष्करात अधिकारी व्हावेया निवडीबद्दल क्षितिज लिमसेला विचारले असता, तो पूर्णत: समाधानी नाही. विदर्भातील एक विद्यार्थ्याने लष्करी सेवेत उच्च पदावर पोहचल्यामुळे आनंद मानण्याचे काहीच कारण नाही. जेव्हा या पदावर विदर्भातून अनेक युवक पोहचून देशसेवा करतील तेव्हाच मला खरा आनंद मिळेल, असे तो म्हणतो तसेच विदर्भातील युवकांना लष्करात येण्याचे तो आवाहन करतो. या निवडीचे श्रेय क्षितिज आपले वडील दीपक लिमसे, आई, बहीण आणि आपल्या गुरूला देतो.
विदर्भातील क्षितिज लिमसे ‘एनडीए’तून उत्तीर्ण
By admin | Updated: June 4, 2017 01:36 IST