शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टात होणार व्हिडिओ रेकॉर्डिंग

By admin | Updated: February 9, 2017 02:47 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी एका फौजदारी अवमानना प्रकरणावरील सुनावणीची व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची विनंती मान्य केली.

अवमानना प्रकरण : पहिलाच निर्णय असल्याची चर्चा नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी एका फौजदारी अवमानना प्रकरणावरील सुनावणीची व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची विनंती मान्य केली. उच्च न्यायालयातील सुनावणीच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगला मान्यता देण्याचा हा देशातील पहिलाच निर्णय असल्याचे विधी क्षेत्रात बोलले जात आहे. न्यायमूर्तीद्वय प्रसन्न वराळे व झेड. ए. हक यांच्या विशेष न्यायपीठाने हा निर्णय दिला. या न्यायपीठासमक्ष अ‍ॅड. सतीश उके यांच्याविरुद्ध फौजदारी अवमानना याचिका प्रलंबित आहे. न्यायमूर्ती, न्यायालयीन अधिकारी व सरकारी वकील यांच्यावर वारंवार मनमानी, तथ्यहीन व अत्यंत गंभीर प्रकारचे आरोप करण्याची उके यांची सवय पाहता, न्यायालयाने स्वत:च ही याचिका दाखल केली आहे. गेल्या १ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने उके यांची वागणूक लक्षात घेता, या प्रकरणावरील सुनावणीची व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याबाबत विचारणा केली होती. त्यानुसार, उके यांनी न्यायालयात अर्ज सादर करून व्हिडिओ रेकॉर्डिंगची मागणी केली. हा अर्ज न्यायालयाने मंजूर केला. व्हिडिओ रेकॉर्डिंगचा संपूर्ण खर्च राज्य शासन करणार आहे. येत्या २२ फेब्रुवारीपासून सुनावणीची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली जाणार आहे. उके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध निवडणूक याचिका दाखल केली होती, हे येथे उल्लेखनीय. (प्रतिनिधी) असे आहे मूळ प्रकरण उके यांनी उच्च न्यायालयात दिवाणी पुनर्विचार अर्ज दाखल केला होता. त्या अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांत व पुर्सिसमध्ये त्यांनी विद्यमान न्यायमूर्ती, न्यायालयीन अधिकारी व सरकारी वकिलावर विविध गंभीर आरोप केले होते. हा अर्ज हाताळणारे न्यायमूर्ती आर. के. देशपांडे यांनाही उके यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. ६ जून २०१६ रोजी न्यायमूर्ती देशपांडे यांनी एकंदरीत इतिहास लक्षात घेता, उके यांच्याविरुद्ध न्यायालय अवमाननेचे मसुदा आरोप निश्चित केले. तसेच, सदर अर्जावरील निर्णय फौजदारी अवमानना याचिका म्हणून ग्राह्य धरण्याचा आदेश प्रबंधक कार्यालयाला दिला होता. आठ आठवडे वेळ देण्यास नकार उके यांनी न्यायालयाच्या नोटीसला उत्तर देण्यासाठी व ६ जून २०१६ रोजीच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी आठ आठवड्यांचा वेळ मागितला होता. न्यायालयाने ही विनंती नामंजूर करून संबंधित अर्ज खारीज केला. तसेच, उके यांना येत्या २२ फेब्रुवारीपर्यंत विस्तृत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. उके यांना स्वत:च्या मालमत्तेची माहितीही न्यायालयात सादर करायची आहे.