शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बारावीच्या परीक्षा केंद्राचे होणार चित्रीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 11:34 IST

बारावीच्या परीक्षेत यंदा प्रथमच नागपूर विभागीय मंडळाकडून परीक्षा केंद्राचे बाहेरून व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकॉपीमुक्त अभियान राबविणार नागपूर बोर्डाची तयारी जोरात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बारावीच्या परीक्षेत यंदा प्रथमच नागपूर विभागीय मंडळाकडून परीक्षा केंद्राचे बाहेरून व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी एका पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. कॉपीमुक्त अभियान जोरकस राबविण्याचा नागपूर बोर्डाचा संकल्प असून, संवेदनशील केंद्रावर विशेष लक्ष राहणार आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा येत्या २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या परीक्षेत नागपूर बोर्डातून १,६६,२३५ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहे. ४७१ परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांना आॅनलाईन परीक्षा प्रवेशपत्र पोहचले आहे. या परीक्षेसाठी ४७१ केंद्रसंचालक व सहा. केंद्रसंचालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ६००० पर्यवेक्षक, १२०० मॉडरेटर, ६५०० व्हॅल्युएशन करणाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. बोर्डाकडून यावर्षी कॉपीमुक्त अभियानावर जोर देण्यात येत आहे. त्यासाठी ४५ भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सोबतच प्रत्येक जिल्ह्याला व्हिडीओ चित्रीकरण करण्यासाठी एका पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाची जबाबदारी डायटच्या महिला पथकावर देण्यात आली आहे. या पथकाच्या माध्यमातून परीक्षा केंद्रावर जो हुल्लडपणा चालतो, कॉपी पुरविण्याचे प्रकार घडतात, त्यावर अंकुश मिळविण्यासाठी व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. नागपूर बोर्डांतर्गत जे संवेदनशील केंद्र आहे, त्यावर हे पथक विशेष लक्ष ठेवणार आहे.

परीक्षेच्या कामातून सुटका करण्यासाठी शिक्षकांची गर्दीबारावीच्या परीक्षेसाठी शिक्षकांच्या मॉडरेटर, पर्यवेक्षक म्हणून नियुक्त्या करण्यात आल्या आहे. यापासून सुटका करण्यासाठी शिक्षकांची बोर्डामध्ये रेलचेल वाढली आहे. कुणी आजाराची कारणे, कुणी लग्न सोहळे, काहींच्या वैयक्तिक अडचणी सांगून ड्युटी रद्द करण्याची मागणी करीत आहे. अनेक शिक्षक संघटनांचाही जोर दाखवित आहे. काहींनी राजकीय शिफारशीचाही अवलंब केला आहे. शिक्षकांकडून सुरू असलेल्या या प्रकारामुळे बोर्डाच्या कामात खोळंबा निर्माण होत आहे.

टॅग्स :examपरीक्षा