शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाच्या विद्यार्थ्यांना दोनदा द्यावी लागेल एमएचटी-सीईटी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 09:56 IST

सीईटी दोनदा द्यावी तर लागणार नाही ना, या शंकेने विद्यार्थ्यांना घेरले आहे. राज्य सीईटी सेलने याबाबत अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही. यामुळे परीक्षेच्या तयारीला लागलेल्या विद्यार्थ्यांसह पालकही तणावात आहेत.

आशिष दुबेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एमएचटी-सीईटीच्या तारखा घोषित होताच विद्यार्थ्यांची चिंता कमी होण्याऐवजी अधिकच वाढली आहे. ही चिंता परीक्षेची नाही तर परीक्षा नियोजनाची आहे. ही

सीईटी सेलने एमएचटी-सीईटीचे आयोजन दोन टप्प्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्याअंतर्गत १ ते ९ ऑक्टोबरदरम्यान फिजिक्स, केमिस्ट्री व बॉयोलॉजी (पीसीबी) साठी आवेदन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीईटीचे आयोजन होईल. दुसऱ्या टप्प्यात १२ ते २० ऑक्टोबरदरम्यान फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथ्स (पीसीएम) साठी आवेदन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीईटीचे आयोजन केले जाणार आहे. विदर्भातील बहुतेक विद्यार्थी दोन्ही अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा देतात. पूर्वी पीसीबी व पीसीएमची परीक्षा एकाच दिवशी होत होती आणि केवळ अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थी फिजिक्स व केमिस्ट्रीचा पेपर देत होते. दुसऱ्या सत्रात गणिताचा पेपर होत होता. फार्मसीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी पीसीबीचा पेपर देत होते. त्यांना गणिताचा पेपर देण्याची गरज नव्हती. दोन्ही अभ्यासक्रमासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच गणिताचा पेपर द्यावा लागत होता.गुरुवारी घोषित परिपत्रकानुसार, सीईटी सेलने पीसीबी व पीसीएमचा पेपर वेगवेगळ्या चरणात घेण्याचे जाहीर केले. त्यामुळे पीसीबीनंतर दुसऱ्यांदा पीसीएमचा पेपर द्यावा लागणार का, असा पश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहे. मात्र सीईटी सेलकडून याबाबत सध्यातरी कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. याबाबत तांत्रिक शिक्षण संचालनालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, आपली भूमिका परीक्षेत सहकार्य करण्याची असून बाकी कार्य सीईटी सेलचे असल्याचे स्पष्ट केले. मात्र विद्यार्थ्यांना चिंता करण्याची गरज नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत सीईटी सेलकडून सविस्तर दिशानिर्देश जाहीर होणार असून विद्यार्थ्यांनी सेलच्या वेबसाईटवर चौकशी करीत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :examपरीक्षा