शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भासाठी विदर्भवादी संघटना एकत्र

By admin | Updated: February 2, 2016 03:01 IST

स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाला बळ मिळावे व जास्तीतजास्त जनतेचा पाठिंबा मिळावा यासाठी विदर्भवादी संघटनांनी एकत्रित काम करण्याची गरज व्यक्त करण्यात येत होती.

संघटितपणे राबविणार आंदोलन : जनजागृतीवर देणार भरनागपूर : स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाला बळ मिळावे व जास्तीतजास्त जनतेचा पाठिंबा मिळावा यासाठी विदर्भवादी संघटनांनी एकत्रित काम करण्याची गरज व्यक्त करण्यात येत होती. संघटित प्रयत्नांची आवश्यकता ओळखून विदर्भ प्रदेश विकास परिषद, जनमंच आणि ‘वेद’ (विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट) या तीन संघटना एकत्र आल्या आहेत. या संघटना यापुढे एकत्रितपणे जनजागृती मोहीम तसेच आंदोलने राबविणार आहेत.यासंदर्भात तिन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत विदर्भ प्रदेश विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष दत्ता मेघे, ‘जनमंच’चे अध्यक्ष अ‍ॅड.अनिल किलोर तसेच ‘वेद’चे अध्यक्ष देवेंद्र पारेख हे प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या संघटनांचे अस्तित्व कायम ठेवून विदर्भाच्या मागणीसाठी एकत्रित काम करण्याच्या प्रस्तावाला यावेळी मान्यता देण्यात आली. आंदोलनाचे कार्यक्रम पुढे चालविण्यासाठी या संस्थांकडून समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. यात तरुण व नव्या नेतृत्वाला स्थान देण्यात येईल. तसेच ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन मंडळ तयार करण्यात येईल, असे ठरविण्यात आले. वेगळ्या विदर्भासाठी काम करणाऱ्या तीन महत्त्वाच्या संघटना एकत्र आल्यामुळे स्वतंत्र राज्याच्या आंदोलनाला आणखी जोर येण्याची चिन्हे आहेत; शिवाय अनेक मोठे चेहरेदेखील या आंदोलनात जुळण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)जनमत वाढविण्यासाठी प्रयत्न करणारया तिन्ही संस्था विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी विविध मार्गातून प्रयत्न करणार आहेत. यात वेगळ्या विदर्भासाठी जनमत वाढविणे, मतदान घेणे, निवेदन देणे, विविध पातळ्यांवर चर्चा करणे, धरणे आंदोलन, सभा घेणे या उपक्रमांचा समावेश राहील. या आंदोलनामध्ये हिंसेला स्थान राहणार नाही व विधायक मार्गानेच हे आंदोलन करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.समन्वय समितीतून पक्षनिर्मिती नकोवेगळ्या विदर्भासाठी आंदोलन करता करता संघटना राजकारणात शिरण्याची शक्यतादेखील आहे. ही बाब लक्षात घेऊन या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. समन्वय समिती कोणताही राजकीय पक्ष काढणार नाही. तसेच कोणी जर असा पक्ष काढत असेल तर त्यात समन्वय समिती सहभागी होणार नाही, असे ठरविण्यात आले आहे. शिवाय इतर विदर्भवादी संघटनांना या समन्वय समितीचा विरोध राहणार नाही. वेळ पडली तर त्यांना पाठिंबाच देण्यात येणार आहे.