शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भवादी संघटनांनी एकत्र यावे

By admin | Updated: January 21, 2016 02:41 IST

विदर्भवादी संघटनांना एकत्र आणण्यासाठी नवराज्य निर्माण महासंघाने पुढाकार घेतला आहे.

नागपूर : विदर्भवादी संघटनांना एकत्र आणण्यासाठी नवराज्य निर्माण महासंघाने पुढाकार घेतला आहे. माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती चौकातील कार्यालयात झालेल्या बैठकीत यावर सखोल चर्चा करण्यात आली.वेगळ्या विदर्भासाठी विविध पक्ष व संघटना वेगवेगळ्या पातळीवर आंदोलन करीत आहेत. सर्वांचा उद्देश एकच असला तरी ऐक्याचा अभाव आहे. यामुळे आंदोलनाची धार बोथट झाली आहे. सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारल्यास त्याचे अनुकूल परिणाम दिसून येतील. त्यासाठी नेतृत्वाचा वाद बाजूला सारून संघटनांनी एकत्र यावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. विदर्भाची मागणी जनतेची नसून धनदांडग्यांची आहे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर ३१ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता आमदार निवासात विदर्भवाद्यांची बैठक होणार आहे. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा तोमर बैठकीला उपस्थित राहतील. महासंघातर्फे विदर्भासह ग्रेटर दिल्ली, हरित प्रदेश, बुंदेलखंड, पूर्वांचल इत्यादी २० राज्यांच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. स्वतंत्र विदर्भासाठी सर्व विदर्भवाद्यांना एका व्यासपीठावर आणण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. यापूर्वी २००९ मधील विधानसभा निवडणुकीनंतर व २०१० च्या सुरुवातीला वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आले होते. त्यावेळी समन्वय समिती स्थापन करण्यात आली होती. समितीतर्फे जेलभरो, विदर्भ बंद, धरणे, निदर्शने इत्यादी आंदोलने करण्यात आली होती. यानंतर काँग्रेस नेत्यांनी माघार घेतली तर, भाजपने वेगळी चूल मांडली. आता परत तसा प्रयोग करण्यात येत असला तरी, भाजप व काँग्रेसच्या सहभागाबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. हे प्रमुख पक्ष सोबत आले नाही तरी इतर समविचारी पक्ष व संघटना एकत्र याव्यात यासाठी महासंघाचे नेते कामाला लागले आहेत. बैठकीत महासंघाचे सरचिटणीस ठाकूर किशोरसिंग बैस, डॉ. गणेश खारकर, विजया धोटे, सुनील चोखारे, डॉ. प्रमोद बनकर, राजेंद्रसिंग राजपूत, अ‍ॅड. सिन्हा, सतीश इटकेलवार आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)