शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ, मेल, दुरांतो रद्द, तीन रेल्वेगाड्या वळविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:07 IST

नागपूर : मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे अंतर्गत कसारा घाटात रेल्वे रुळावर दगड, माती आल्यामुळे आणि रेल्वे रुळ वाहून गेल्यामुळे ...

नागपूर : मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे अंतर्गत कसारा घाटात रेल्वे रुळावर दगड, माती आल्यामुळे आणि रेल्वे रुळ वाहून गेल्यामुळे टिटवाळा-कसारा रेल्वे सेक्शनमध्ये रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. त्याचा परिणाम नागपूरच्या रेल्वेगाड्यांवरही पडला. विशेष म्हणजे विदर्भ एक्स्प्रेस, मुंबई-हावडा मेल, सेवाग्राम एक्स्प्रेस आणि मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसच्या प्रवाशांची गैरसोय झाली.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे कसारा घाटात रेल्वे रुळ वाहून गेल्यामुळे मुंबईवरून गुरुवारी मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस, मुंबई-हावडा मेल आणि मुंबई नागपूर दुरांतो एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. त्यामुळे शुक्रवारी या गाड्या नागपुरात येणार नाहीत. नागपूरवरून गुरुवारी गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस आणि हावडा-मुंबई मेल नियोजित वेळेनुसार नियोजित मार्गाने रवाना करण्यात आल्या. मुसळधार पावसामुळे बुधवारी नागपूरवरून रवाना झालेली नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस भुसावळपर्यंत चालविण्यात आली तर गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस चाळीसगावपर्यंत चालविण्यात आली. त्याच प्रमाणे नागपूर-दादर सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिकमध्ये शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली. या तीन्ही गाड्यांपैकी दुरांतो एक्स्प्रेस आणि विदर्भ एक्स्प्रेस प्रवाशांना घेऊन नागपुरात आल्या तर सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिकवरून नागपूरसाठी रवाना करण्यात आली.

.............

वळविलेल्या मार्गाने धावल्या रेल्वेगाड्या

मध्य रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा स्पेशल ही गाडी वळविलेल्या वसई रोड, नंदुरबार, जळगाव या मार्गाने चालविली. तर पुरी-लोकमान्य टिळक टर्मिनस फेस्टिव्हल स्पेशल आणि हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशलला वळविलेल्या जळगाव, नंदुरबार, वसई रोड या मार्गाने चालविण्यात आले. त्यामुळे या गाड्या विलंबाने धावल्या असून प्रवाशांची गैरसोय झाली.

रेल्वेस्थानकावर हेल्पलाईन बूथ, बसेसची व्यवस्था

मुसळधार पावसामुळे वळविलेल्या मार्गाने आणि शॉर्ट टर्मिनेट झालेल्या रेल्वेगाड्यातील प्रवाशांसाठी नागपूर रेल्वेस्थानकावर पॅसेंजर हेल्पलाईन बूथ सुरु करण्यात आले. याशिवाय गैरसोय झालेल्या प्रवाशांसाठी चहा, पाण्याची व्यवस्था करण्यात आली. मुंबई रेल्वे प्रशासनाने २९ बसेसमधून १२९० प्रवाशांना कसारावरून कल्याणला रवाना केले तर ४४ बसेसच्या माध्यमातून २८६० प्रवाशांना इगतपुरीवरून कल्याणला आणण्यात आले. भुसावळ आणि चाळीसगावमध्ये शॉर्ट टर्मिनेट झालेल्या दुरांतो आणि विदर्भ एक्स्प्रेसच्या ५३० प्रवाशांना परत नागपूरला पाठविण्यात आले.

३३ रेल्वेगाड्या डायव्हर्ट, ४८ रद्द

मध्य रेल्वे झोनने दिलेल्या माहितीनुसार मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळ वाहून गेल्यामुळे तसेच रेल्वे रुळावर माती, दगड आल्यामुळे महाराष्ट्रातील ३३ रेल्वेगाड्या डायव्हर्ट कराव्या लागल्या तर ५१ रेल्वेगाड्या शॉर्ट टर्मिनेट, ४८ रेल्वेगाड्या रद्द आणि १४ रेल्वेगाड्या शॉर्ट ओरिजनेट करण्यात आल्या.

............

मुसळधार पावसामुळे प्रवास केला रद्द

‘मुंबईला महत्वाच्या कामासाठी जात होतो. जाताना नागपूर-मुंबई दुरांतोचे आणि येताना मुंबई-नागपूर दुरांतोचे कन्फर्म तिकीट होते. परंतु मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत अडकुन पडण्याची शक्यता असल्यामुळे प्रवास रद्द करण्याचा निर्णय घेतला.’

-निखील बोंडे, प्रवासी

...........