शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील सिंचनाचा अनुशेष कायम!

By admin | Updated: August 10, 2014 20:55 IST

वेळ निघून गेल्यावर मिळाली सुधारित मान्यता

अकोला: सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या अभावी, सिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेकरिता मागणीनुसार निधी उपलब्ध झाला नसल्याने, सिंचनाचा मोठा अनुशेष असलेल्या विदर्भातील सिंचन प्रकल्प रखडल्याची बाब ह्यलोकमतह्णने उजेडात आणताच, शासनाच्या जलसंपदा विभागाने काही प्रकल्पांच्या कामांना नुकतीच सुधारित मान्यता दिली. मान्यता मिळण्यास विलंब झाल्यामुळे कामे निर्धारित वेळेत पूर्ण करणे शक्य दिसत नाही आणि परिणामी जलसंपदा विभागाच्या विदर्भातील अधिकार्‍यांपुढे अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. पश्‍चिम विदर्भाचा विचार केल्यास, सिंचन प्रकल्पांच्या कामांसाठी मागणीनुसार निधी उपलब्ध झाला नसल्याने, २ लाख ४७ हजार हेक्टर क्षेत्राचा सिंचन अनुशेष कायम आहे. आर्थिक अनुशेष संपला व केवळ भौतिक अनुशेष शिल्लक आहे, असे शासनातर्फे सांगितल्या जात असले तरी, बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव या बड्या प्रकल्पाच्या कामासाठी आर्थिक रसद कमी पडत आहे. अकोला जिल्हय़ातील नेरधामणा, काटेपूर्णा, घुंगशी व उमा या बॅरेजेसची कामे अर्धवटच आहेत. काटीपाटी, कंचनपूर प्रकल्प बांधकामाच्या प्रतीक्षेत आहेत, तर अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा प्रकल्पाची पाटचार्‍याची कामे रखडली आहेत. राज्यपालांच्या निर्देशानुसार, पश्‍चिम विदर्भातील १0२ प्रकल्पांचा अनुशेष कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे; परंतु विदर्भातील सिंचन प्रकल्पांना साधी प्रशासकीय मान्यताही मिळाली नव्हती. आता कुठे वाई संग्राहक व पोपटखेडा-२ या दोन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्रातील सिंचनाचा अनुशेष परिगणित करण्यासाठी १९९४ मध्ये निर्देशांक व अनुशेष समिती गठित करण्यात आली होती. त्या समितीच्या अहवालानुसार, जून १९९४ अखेर विदर्भाचा एकूण भौतिक अनुशेष ७.८४७ लक्ष हेक्टर (५६.७४ टक्के), तर आर्थिक अनुशेष ४,२६५ कोटी रुपये एवढा होता. निर्देशांक व अनुशेष समितीने प्रति हेक्टरी ५0,000 रुपये या खर्च मानकानुसार हा अनुशेष निर्धारित केला होता. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमधील जून १९९४ अखेरचा भौतिक अनुशेष ३.४९४ लक्ष हेक्टर व आर्थिक अनुशेष २,४७८ कोटी रुपये एवढा होता. तब्बल एक लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याची क्षमता असलेल्या, बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव सिंचन प्रकल्पाच्या कामासाठी निधीची पूर्तता वेळेवर होत नसल्याने, प्रकल्पाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाचाही अनुशेष कार्यक्रमात समावेश आहे. जून १९९४ व जून २00७ अखेर अमरावती विभागातील सिंचनाचा भौतिक अनुशेष ३.४९४ लक्ष हेक्टर रब्बी समतुल्य होता. आर्थिक वर्ष २0१0-११ मधील अनुशेषाचे आकडे बघितल्यास, अमरावती विभागाचा २ लाख ४७ हजार हेक्टर अनुशेष कायम आहे. त्यामध्ये अमरावती जिल्ह्याचा भौतिक अनुशेष ८२ हजार हेक्टर, अकोल्याचा ९६ हजार हेक्टर व बुलडाण्याचा ६९ हजार हेक्टर एवढा आहे. याचाच अर्थ १९९४ ते २0११ या १७ वर्षांच्या कालावधीत केवळ ५0,४९४ हेक्टर क्षेत्राचा अनुशेष निकाली निघाला. राज्याच्या उर्वरित प्रदेशांच्या तुलनेत ही गती कासवापेक्षाही कमी आहे. त्याचा परिणाम एकूणच वर्‍हाडातील शेती, सामाजिक, आर्थिक परिस्थितीवर होत आहे.