शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

असंतुष्टांची ‘विदर्भ इंदिरा काँग्रेस’ची तयारी

By admin | Updated: November 5, 2016 03:01 IST

शहर कार्यकारिणीच्या घोषणेनंतर नागपुरात काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून समोर आली.

मुत्तेमवार, ठाकरे यांच्यावर नाराजी : दुसरा पक्ष स्थापणारनागपूर : शहर कार्यकारिणीच्या घोषणेनंतर नागपुरात काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून समोर आली. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाराजांना विश्वासात घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्षश्रेष्ठींकडून झाला नाही. यामुळे दुखावलेल्या असंतुष्ट नेत्यांनी आता ‘विदर्भ इंदिरा काँग्रेस’ या नावाने दुसरा पक्षच काढण्याची तयारी चालविली आहे. विशेष म्हणजे माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार व शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यावरील नाराजीतून उठलेले हे लोण विदर्भभर पसरले असून विविध कारणांनी काँग्रेसवर नाराज असलेले नेतेही या दुसऱ्या पक्षाच्या बांधणीत हातभार लावण्यास तयार असल्याची माहिती आहे.माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री नितीन राऊत, आ. सुनील केदार यांच्यासह विदर्भातील काही नेत्यांनी ही मोहीम हाती घेतली आहे. प्राप्त माहितीनुसार संबंधित नेत्यांनी यासाठी विदर्भातील नेत्यांशी संपर्कही साधला आहे. निवडणुकीच्या तोंडावर प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यावर दबाव निर्माण करण्याचाही या मोहिमेचा हेतू असल्याचे बोलले जात आहे. नागपूर शहर कार्यकारिणीच्या घोषणेनंतर माजी मंत्री नितीन राऊत यांनी नाराजी व्यक्त केली होती. विधानसभा निवडणुकीत राऊत यांच्या विरोधात काम करणाऱ्यांना कार्यकारिणीत घेण्यात आले असून संबंधितांना तत्काळ पदमुक्त करावे, अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी लावून धरली होती. या मागणीसाठी राऊत समर्थकांनी शहर काँग्रेसच्या तीन बैठकांवर बहिष्कार टाकला. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचेही काही समर्थक बैठकीला अनुपस्थित राहिले. दुसरीकडे सलग तीन बैठकांना अनुपस्थित राहणाऱ्यांना पदमुक्त करण्याचा ठराव शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी कार्यकारिणीच्या तिसऱ्या बैठकीत मंजूर करून प्रदेशाध्यक्षांकडे पाठविला. त्यामुळे राऊत, चतुर्वेदी आणखीनच दुखावले. कार्यकारिणी तयार करताना आपल्याला विश्वासात घेण्यात आले नाही. आपल्या समर्थकांना कमी महत्त्वाची पदे देण्यात आली, असे राऊत, चतुर्वेदी समर्थकांकडे बोलून दाखवित आहेत. आम्ही पक्षश्रेष्ठींना हे सर्व कळविले आहे. आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही तर आमच्याकडे दुसरा पक्ष काढण्याशिवाय पर्याय राहणार नाही, या टोकापर्यंत हे नेते पोहचले असल्याची माहिती आहे. असे झाले तर नागपुरात इतिहासाची पुनरावृत्ती होईल व पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे निवडणूक चिन्ह ‘पंजा’ गोठवले जाऊ शकते, असा या नेत्यांच्या समर्थकांचा दावा आहे. याबाबत नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.(प्रतिनिधी)