शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाचा लढा एकत्रित लढणार

By admin | Updated: March 28, 2016 03:23 IST

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी वेगवेगळ्या संघटना लढत आहेत. या सर्व संघटनांनी आता एकत्र यावे आणि एकत्रित लढा

नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी वेगवेगळ्या संघटना लढत आहेत. या सर्व संघटनांनी आता एकत्र यावे आणि एकत्रित लढा देण्यासाठी सज्ज व्हावे, असे माजी खासदार दत्ता मेघे आणि ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. श्रीहरी अणे या दोन विदर्भवादी नेत्यांच्या बैठकीत ठरले. अ‍ॅड. श्रीहरी अणे हे राज्याच्या महाधिवक्तापदाचा राजीनामा देऊन शनिवारी नागपुरात आले. त्यावेळी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. तेव्हापासून ते स्वतंत्र विदर्भासाठी लढणाऱ्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. शनिवारी त्यांनी राजकुमार तिरपुडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती तर रविवारी ज्येष्ठ विदर्भवादी नेते दत्ता मेघे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी वनराईचे गिरीश गांधी, विदर्भ कनेक्टचे अध्यक्ष अ‍ॅड. मुकेश समर्थ, जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, प्रा. शरद पाटील, अ‍ॅड. संदेश सिंगलकर, महेश पुरोहित, राजू मिश्रा, मेहमूद अन्सारी, बाळ कुलकर्णी प्रामुख्याने उपस्थित होते. दत्ता मेघे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन अ‍ॅड. अणे आणि उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. विदर्भ राज्य सहजासहजी मिळणार नाही. लोकही सहजासहजी जुळणार नाहीत. त्यामुळे अगोदर तशी वातावरण निर्मिती करावी लागेल. त्यामुळे अगोदर विदर्भवादी संघटनांना एकत्र घ्यावे लागेल. स्वतंत्र विदर्भ व्हावा यासाठी अनेक संघटना काम करीत आहेत. त्या सर्वांनी एकत्र येऊन लढण्यावर एकमत झाले. त्या संघटनांनी आपापल्या संघटनांचा उद्देश संभाळून एकत्र यावे, असेही यावेळी ठरले. केवळ विदर्भवादी संघटनाच नव्हे तर वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तीसुद्धा विदर्भासाठी काम करायला तयार आहेत, त्यांनाही सोबत घ्यावे, असे ठरले. (प्रतिनिधी)