शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

विदर्भात मान्सूनची हुलकावणी ?

By admin | Updated: June 19, 2017 14:49 IST

राज्यात मान्सूनच्या पावसाने प्रवेश केला आहे पण विदर्भात अद्याप दमदार आगमन झाले नसल्याने विदर्भाला मान्सूनचे याहीवर्षी हुलकावणी

 राजरत्न सिरसाट/ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 19 - राज्यात मान्सूनच्या पावसाने प्रवेश केला आहे पण विदर्भात अद्याप दमदार आगमन झाले नसल्याने विदर्भाला मान्सूनचे याहीवर्षी हुलकावणी दिल्याची भावना शेतकºयांमध्ये निर्माण झाली आहे. अनेक शेतकºयांनी पेरणी केली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर नव्या वाणांचे प्रात्यक्षीत घेण्यात येत आहे पण पाऊसच नसल्याने पेरणी केलेल्या पिकांना तुषार सिंचनाव्दार ेजगविण्याचा केविलवाने प्रयत्न सुरू  आहेत.मान्सूच्या पावसासाठी मात्र आणखी तीन ते चार दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे नागपूर वेधशाळेचे संकेत आहेत.
राज्यात उशिरा मान्सूनचे आगमन झाले पण यावर्षी दमदार पावसाचे भाकीत भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत.पश्चिम महाराष्टÑ,मराठवाडा,कोकण विभागात पाऊस पडलाही परंतु विदर्भ अद्याप दमदार सार्वत्रिक पावसापासून वचिंत आहे. चांगल्या पावसाच्या संकेतामुळे विदर्भातील शेतकºयांनी यावर्षी कापूस पिकाचे नियोजन केले आहे. या पिकांंची पेरणीदेखील करण्यात येत आहे. भरपूर पाऊस लागणाºया या पिकांचे काही ठिकाणी अकंूरही निघाले आहे. आताच या पिकाला पाण्याची गरज आहे तसेच पेरणीसाठीदेखील दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
 नागपूरच्या हवामानशास्त्र विभागाने १६ जून रोजी विदर्भात मान्सूनने प्रवेश केला असल्याची घोषणा केली आहे.त्यांच्या माहितीनुसार नैऋत्य मान्सून  मध्य महाराष्ट्रच्या काही भागांमध्ये पुढे गेला आहे, मराठवाडा, उर्वरित भाग, विदर्भ काही भाग, छत्तीसगढचा काही भाग, ओडिशातील बहुतेक भाग, पश्चिम बंगाल उर्वरित भागात पोहोचला आहे. झारखंड आणि बिहारचे काही भागात तो पोहोचायचा आहे. मान्सूनची उत्तर सीमा (एनएलएम) लॅटमधून उत्तीर्ण होते. २०.५ एन / लांब ६० अंश ई, लाट. २०.५ एन / लांब ७० ई, वलसाड, नाशिक, बुलढाणा, यवतमाळ, कांचर, झारसुगुडा, जमशेदपूर, भागलपूर आणि लाट. २७.0 अंश एन / लांब ८६.० ई अंशात आहे. तसेच नैऋत्य मान्सूनच्या पुढील तीन ते चार दिवसांत मध्य महाराष्ट्र, विदर्भ, छत्तीसगढ, झारखंड आणि बिहार आणि ओडिशातील उर्वरित भागांमध्ये अधिक अनुकूलतेसाठी अनुकूल परिस्थिती विकसित होत असल्याचे भाकीत वर्तविले होेते. 
-मान्सूनसाठीचे हवामान अनुकूल असून, यवतमाळ, बुलडाणा या भागातानून मान्सूनचे वारे खालच्या दिशेने वाहत आहेत.येत्या तीन दिवसात विदर्भातील काही भागात मान्सून सक्रीय होण्याचे संकेत आहेत. 
ए.डी.थाटे,
संचालक,
हवामानशास्त्र विभाग,
नागपूूर.