शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भवादी धडकले गडकरींच्या वाड्यावर

By admin | Updated: August 10, 2016 02:14 IST

वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी मंगळवारी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या बॅनरखाली एकत्र येत हजारो विदर्भवाद्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी ....

विदर्भ राज्य आंदोलन समितीचा मोर्चा : हजारोंचा सहभाग, ठिय्या आंदोलनही नागपूर : वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी मंगळवारी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या बॅनरखाली एकत्र येत हजारो विदर्भवाद्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महालातील वाड्यावर धडक दिली. पोलिसांनी मध्येच मोर्चा थांबविल्यामुळे विदर्भवाद्यांनी तेथेच ठिय्या दिला. सत्ता आल्यानंतरही भाजप नेते वेगळा विदर्भ देण्याचे आश्वासन पाळताना दिसत नाही, अशी नाराजी व्यक्त करीत १ जानेवारीपासून ‘विदर्भ देता की जाता’ आंदोलन सुरू केले जाईल, अशी घोषणा या वेळी करण्यात आली. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक अ‍ॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात दुपारी १.३० च्या सुमारास टिळक पुतळा महाल येथील भाजप कार्यालयापासून विदर्भवाद्यांचा मोर्चा निघाला. मोर्चात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले, महिला आघाडीच्या अध्यक्ष अ‍ॅड. नंदा पराते, युवक आघाडीचे अध्यक्ष प्रदीप धामनकर (अमरावती), उमेशबाबु चौबे, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्रबीरकुमार चक्रवर्ती, धनंजय धार्मिक, जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांच्यासह विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यांतून आलेले हजारो विदर्भवादी कार्यकर्ते सहभागी झाले. महिला, युवकांसह आदिवासी बांधवांचाही सहभाग लक्षणीय होता. मोर्चेकरी आक्रमक होते. मोर्चातील लक्षवेधी गर्दीमुळे तब्बल तीन तास महालातील वाहतूक बंद ठेवण्यात आली. मोर्चा गडकरींच्या घराकडे आगेकूच करीत असताना घरापूर्वीच घाटे दुग्ध मंदिराच्या समोर पोलिसांनी मोर्चा अडविला. यावेळी विदर्भवाद्यांनी वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करीत भाजप नेते व सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी युवा कार्यकर्त्यानी बॅरिकेट तोडून आगेकूच करण्याचा नारा दिला. मात्र, ज्येष्ठ नेत्यांनी तरुणांना आवर घातला. शेवटी आंदोलकांनी तेथेच ठाण मांडले. दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास गडकरींचे स्वीय सहायक सुधीर देऊळगावकर निवेदन स्वीकारायला आले. त्यानंतर अ‍ॅड. वामनराव चटप यांनी मार्गदर्शन केले व मोर्चाचा समारोप झाला. आंदोलनात माजी आमदार दिलीप बनसोड, विदर्भ कनेक्टचे अध्यक्ष अ‍ॅड. मुकेश समर्थ, विदर्भ राज्य आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. रवि सान्याल, माया चवरे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, वनश्री शेडाम, राम आखरे, संदेश सिंगलकर, शरद पाटील, नितीन रोंघे, किशोर राऊत, डॉ. दीपक मुंढे, अरुण केदार, आनंदराव वंजारी, अर्चना नंदाघरे, मधुकर हरणे आदींनी भाग घेतला.