शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

विदर्भात आनंद जवादे ‘टॉप’

By admin | Updated: May 30, 2017 16:54 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला.

आॅनलाईन लोकमतनागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल २.७ टक्क्यांनी वाढला असला तरी राज्यातील स्थान मात्र घसरले आहे. यंदा विभागाची पाचव्या स्थानावरुन सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. संपूर्ण विभागाच्या निकालाची आकडेवारी ८९.०५ टक्के इतकी आहे. नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा विद्यार्थी आनंद जवादे याने ९८.१५ टक्के गुण प्राप्त करत विदर्भातून अव्वल क्रमांक पटकाविला आहे. विद्यार्थिनींनी मारली बाजीविभागात नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली असून उत्तीर्णांमध्येदेखील विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त आहे. विभागातून ८५ हजार ६८० विद्यार्थिनींनी परीक्षा दिली व त्यातील ७८ हजार ७९५ उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९२.१६ टक्के इतकी आहे. तर विद्यार्थ्यांचे प्रमाण ८८.६१ टक्के इतके आहे. सोमवारी दुपारी १ वाजता नागपूर विभागाचे निकाल जाहीर करण्यात आले. नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष संजय गणोरकर यांनी निकालाची घोषणा केली. नागपूर विभागात एकूण १ लाख ७१ हजार ४८७ पैकी १ लाख ५२ हजार ७०४ परीक्षार्थ्यांनी यश संपादित केले. नियमित विद्यार्थ्यांची विभागीय आकडेवारीअभ्यासक्रमपरीक्षार्थीउत्तीर्ण टक्केवारीविज्ञान६९,०३३६६,३४४९६.१०कला७०,८४९५८,३१३८२.३१वाणिज्य२३,२३५२०,८८५८९.८९एमसीव्हीसी८,३७०२०,८८५८५.५७एकूण१,७१,४८७१,५२,७०४८९.०५विभागात भंडारा जिल्हा ‘टॉप’नागपूर विभागात यंदा भंडारा जिल्ह्यातील उत्तीर्णांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. भंडारा जिल्ह्यातून १९ हजार ३९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १८ हजार २७ म्हणजेच ९२.९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर विभागात उत्तीर्णांची सर्वात कमी टक्केवारी वर्धा जिल्ह्याची आहे. तेथे १८ हजार ४६८ पैकी १५ हजार ७४७ म्हणजे ८५.२७ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. नागपूर जिल्ह्याचा निकाल ८९.५४ टक्के इतका लागलाजिल्हानिहाय उत्तीर्णांची टक्केवारीजिल्हानिकाल टक्केवारीभंडारा ९२.९३ %चंद्रपूर ८८.३२ %नागपूर ८९.५४ %वर्धा ८५.२७ %गडचिरोली ८५.५७ %गोंदिया ९०.४० %