शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात सरासरी ३0 टक्के पावसाची तूट कायम !

By admin | Updated: August 25, 2014 02:23 IST

वर्‍हाडातील पावसाची सरासरी ४५ टक्के; शेतकरी चिंतातूर; भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट.

अकोला : पावसाळा सुरू होऊन तीन महिने होत आले असले तरी, पूरक पाऊस झाला नसल्याने विदर्भात ३0 टक्के पावसाची तूट कायम आहे. वर्‍हाडातील ही तूट सरासरी ४५ टक्के असल्याने शेतकरी चिंतातूर झाले असून, भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भीषण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.यावर्षी दीड महिना उशिरा पावसाला सुरुवात झाली. १५ व २३ जुलै या दोन दिवशी पावसाने हजेरी लावली; पण हा पाऊस विदर्भातील एकूण सरासरी गाठण्यास पुरेसा नव्हता. त्यामुळे पावसाची सरासरी ३0 टक्के तूट कायम आहे. सर्वाधिक पावसाची झळ पूर्व विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ जिल्ह्यांना बसली. तुलनात्मकदृष्ट्या पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्हय़ाला कमी झळ बसली असून येथे ४६ टक्के कमी पाऊस झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात ३२ टक्के कमी पाऊस झाला आहे.संपूर्ण विदर्भात आतापर्यंत एकूण सरासरी ७२७.८ मि.मी. पाऊस हवा होता. तथापि, २४ ऑगस्टपर्यंत केवळ ५११.६ मि.मी. एवढीच पावसाची नोंद झाली आहे. यात पश्‍चिम विदर्भातील वाशिम जिल्हय़ात ४७ टक्के तूट कायम असून, यवतमाळ जिल्हय़ात ४९ टक्के तूट आहे. बुलडाणा जिल्हा ३४ टक्के, अकोला २३ टक्के तर अमरावती जिल्हय़ात सरासरीच्या १७ टक्के पाऊस कमी झाला आहे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्हय़ात ४६ टक्के पावसाची तूट कायम आहे. त्या खालोखाल गडचिरोली ३२ टक्के, वर्धा २१ टक्के, भंडारा १६ टक्के, नागपूर १५ तर गोंदिया जिल्ह्यात २ टक्के पावसाची तूट कायम आहे.

*२३ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३0 वाजता संपलेल्या चोविस तासात पश्‍चिम विदर्भातील काही तालुक्यात केवळ १ ते ३ से.मी. पावसाची नोंद पुणे हवामान विभागाने केली आहे.