शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

असत्यावर सत्याचा विजय

By admin | Updated: October 5, 2014 01:00 IST

सनातन धर्म युवक सभेच्यावतीने शुक्रवारी कस्तूरचंद मैदानावर रावण दहन करून, ६३ वा दसरा महोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे

नागपूर : सनातन धर्म युवक सभेच्यावतीने शुक्रवारी कस्तूरचंद मैदानावर रावण दहन करून, ६३ वा दसरा महोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत व उद्योगपती किशोर राय उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पं. राममनोहर मिश्रा यांच्या हस्ते रावण, कुंभकर्ण व मेघनादच्या पुतळ्यांचे पूजन करण्यात आले. यानंतर कलाकारांनी अप्रतिम नृत्य सादर केले. तसेच शिवप्रतिष्ठा संस्थेच्या ढोलांचा गजर, फटाक्यांची आतशबाजी व रावणावर आधारित नृत्यनाटिका या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले होते. दरम्यान किशोर राय यांच्या हस्ते गतवर्षी राम-लक्ष्मण व जानकी यांची भूमिका पार पाडणाऱ्या कलाकारांना शिवदत्त शर्मा स्मृती पुरस्कार प्रदान करून, त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच मोहन भागवत यांच्या हस्ते ‘सनातन समाचार’ या दसरा विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने उपस्थित उपमहापौर मुन्ना पोकुलवार, आ. सुधाकर देशमुख, नगरसेवक राजीव थूल, रवींद्र कौर बावा, सुरेश जग्यासी, जयप्रकाश गुप्ता, प्रमोद वालमांढरे, रूपा राय, मिलिंद माने, कर्नल विनीत मित्तल व पोलीस उपायुक्त निर्मला देवी यांचाही सत्कार करण्यात आला. पाहुण्यांचे स्वागत सनातन धर्म युवक सभेचे अध्यक्ष विजय खेर, महासचिव संजीव कपूर, वरिष्ठ उपाध्यक्ष योगराज साहनी, राकेश कोचर, हेमंत साहनी, निर्मल दुधानी, गुलशन साहनी, मिलन साहनी, ओ. पी. वर्मा, हरिओम साहनी, सुचित्रा खेर व नीलिमा सुरी यांनी केले. प्रास्ताविक पं. उमेश शर्मा यांनी केले. तर संचालन नरेंद्र सतीजा यांनी केले. राजीव गांधी पार्क येथे रावण दहननगरसेवक प्रशांत धवड मित्र परिवारातर्फे प्रभाग ४७ मधील राजीव गांधी पार्क येथे विजयादशमीनिमित्त रावण दहन करण्यात आले. या वेळी मोठ्या प्रमाणात रोषणाई व आतषबाजी करण्यात आली. निवडणूक सुरू असल्यामुळे आचारसंहिता भंग होणार नाही याची काळजी आयोजकांनी घेतली. या कार्यक्रमाला कुठल्याही राजकीय व्यक्तीला निमंत्रित करण्यात आले नाही. प्रभागातील नागरिकांच्या हस्ते रावण दहन करण्यात आले. यावेळी नगरसेवक प्रशांत धवड यांनी सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. गणेशनगर भागात मोठ्या प्रमाणात स्वागत द्वार उभारण्यात आले होते. रस्त्याने विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या वेळी झालेल्या फटाका शो ने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. संचालन रमेश लांजेवार यांनी केले. आभार संजू रणदिवे यांनी मानले. कार्यक्रमाला नवज्योत क्रीडा मंडळाचे अध्यक्ष रघुवीरसिंग टाकूर, राजाभाऊ खोपडे, मारोतराव ठाकरे, रामभाऊ भोयर, संतोष लिखितकर, बिडकर, रामभाऊ वानखेडे, भाऊराव राजधरकर, नत्थुजी धांडे, चंद्रकांत सावरबांधे, विशाल भगत, मधुकरराव भड, खोंडे, काळे, भांडे, दिलीप तिजारे, सुनील भगत, काकडे, दिवाकर, पाटणकर, दीपक गुर्वे, लढ्ढा, उल्हास कामुने आदी उपस्थित होते. रोटकर ले-आऊटमध्ये रावणदहन रोटकर ले-आऊट येथील न्यू ओम नागरिक सुधार समितीतर्फे दरवर्षी रावणदहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही परिसरात रावणदहन सोहळा उत्साहात साजरा झाला. रावणदहनापूर्वी भव्य फटाका शो झाला. हा सोहळ नगरसेवक दीपक कापसे, डी. डी. सोनटक्के, विवेक निकोसे, यशराज मुळक यांच्या उपस्थितीत पार पडला. परिसरातील हजारो लोकांनी या सोहळ्याचा आनंद लुटला. या कार्यक्रमाला समितीचे अध्यक्ष केवलराव रोटकर, महेंद्र मुळे, शेषराव खंडार, वंदना रोटकर, अंजली पाटील, अनुराग रोटकर, प्रशांत वानखेडे, आशु खंडार, अविनाश भट, दत्तू सहारे यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)