शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

हा तर लोकमताचा विजय : कृपाल तुमाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 21:01 IST

भाजपने देशभरात दणदणीत यश मिळवीत केंद्रात सत्तेचा गड सर केला. रामटेकच्या गडावर शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी सलग दुसऱ्यांदा भगवा फडकवीत विजय संपादित केला. या विजयाबद्दल तुमाने यांच्याशी साधलेला संवाद.

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : भाजपने देशभरात दणदणीत यश मिळवीत केंद्रात सत्तेचा गड सर केला. रामटेकच्या गडावर शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी सलग दुसऱ्यांदा भगवा फडकवीत विजय संपादित केला. या विजयाबद्दल तुमाने यांच्याशी साधलेला संवाद.प्रश्न : विजयाचे श्रेय कुणाला द्याल?उत्तर : मी मतांनी जिंकलो. मात्र रामटेक मतदार संघातील जनतेने माझे मन जिंकले. मतदार संघातील सामान्य नागरिक व शेतकरी माझ्या विजयाचे शिल्पकार आहेत.प्रश्न : आपल्या विजयात भाजपाचा वाटा किती?उत्तर : निवडणूक जाहीर झाल्यापासून शिवसेना आणि भाजपचे नेते आणि कार्यकर्ते अहोरात्र माझ्यासाठी झटले. भाजपच्या आमदारांनी त्यांच्या मतदार संघात मला लीड दिली. युती धर्माचा हा विजय आहे.प्रश्न : दुसरी टर्म मिळेल याची खात्री होती का?उत्तर : २०१४ मध्ये खासदार झाल्यानंतर पाचही वर्ष मतदारांच्या संपर्कात राहिलो. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाच्या अडीअडचणीत धावून गेलो. त्यामुळे दुसरी टर्म मिळेल, याचा विश्वास होता.प्रश्न : शेतकऱ्यांसाठी काय करणार ?उत्तर : शेतकरी हा माझा कणा आहे. शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी मी आधीपासूनच आग्रही राहिलो आहे. संसदेतही शेतकऱ्यांच्या समस्यांवर बोललो. सरकारने शेतकऱ्यांच्या हितांची धोरणे आखली आहेत. शेतकऱ्यांची परिस्थिती निश्चितच बदलेल.प्रश्न : मतदार संघाचा किती विकास झाला?उत्तर : विकास निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. गत पाच वर्षांत रामटेक मतदार संघाचा लूक निश्चितच बदलला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यात सिमेंट रस्त्यांचे जाळे विणले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने जिल्हा विकास निधीतून मतदार संघात भरपूर कामे झाली. खासदार फंडाचे योग्य नियोेजन केले. माझा विजय विकास कामांची पावती आहे.प्रश्न : पुढील पाच वर्षातील संकल्प?उत्तर : शेतकऱ्यांना बळ देणे, बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. ग्रामीण भागातील जनतेला चांगले उपचार मिळण्यासाठी मतदार संघातील आरोग्य यंत्रणा अद्ययावत करणे.

टॅग्स :Krupal Tumaneकृपाल तुमानेinterviewमुलाखत