शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
3
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
4
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
5
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
6
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
7
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
8
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
9
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?
10
काँग्रेसच्या नेत्याने कार्यक्रमात म्हटलं बांगलादेशचं राष्ट्रगीत, भाजपा आक्रमक, काँग्रेसनं दिलं असं प्रत्युत्तर
11
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
12
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
13
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
14
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
15
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
16
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
17
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
18
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
19
"सर, ब्रेकअप झालंय" Gen Z कर्मचाऱ्यानं बॉसला पाठवला ईमेल; लगेच १० दिवसांची सुट्टी मंजूर, कारण..
20
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?

दुहेरी अन्यायाचे बळी

By admin | Updated: May 11, 2017 02:24 IST

कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी व त्याच्या भाडोत्री गुंडांनी दहशतीच्या बळावर झिंगाबाई टाकळी परिसरात

कसा मिळणार न्याय? : ग्वालबन्सीने मारले, सरकारने उद्ध्वस्त केले, भूमाफियाच्या संपत्तीतूनच व्हावे गरिबांचे पुनर्वसन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी व त्याच्या भाडोत्री गुंडांनी दहशतीच्या बळावर झिंगाबाई टाकळी परिसरात उभारलेले अवैध साम्राज्य पोलीस, मनपा आणि नासुप्रने मंगळवारी धडाकेबाज कारवाईत खालसा केले. या कारवाईचे स्वागत व्हायलाच हवे. परंतु या कारवाईत शेकडो गरिबांचे अवघे संसारच उद्ध्वस्त झाले आहे. पोटाला चिमटा काढून पै-पै जमवणारी या झोपडपट्टीतील गरीब जनता दुहेरी अन्यायाची बळी ठरली आहे. यातला पहिला अन्याय ग्वालबन्सीने बक्कळ पैशांच्या मोबदल्यात ही अवैध जमीन या गरिबांच्या माथी मारून केलाय तर दुसरा अन्याय या लोकांंची संसारे उद्ध्वस्त करताना ते कुठे जातील, याचा विचार न करता त्यांच्या घरांवर बुलडोझर चालविणाऱ्या पोलीस आणि मनपा प्रशासनाने केला आहे. दहशतीच्या बळावर ही जमीन ताब्यात घेतल्याचे कळताच कुणीतरी न्यायालयात गेले. न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले अन् बुलडोझर या गरिबांच्या झोपड्यांवर धडकायला लागले. नियमाने सारेच अगदी सनदशीर. पण, असे झोपड्यांवर बुलडोझर धडकविताना घरे-दारे गमावलेली ही माणसे भरउन्हात आपल्या चिल्या-पिल्यांसह कसे जगतील, याचा विचार प्रशासनाने केला नाही. पण, तसा विचार व्हायला पाहिजे. सरकार ग्लालबन्सीच्या अशा शेकडो अवैध जमिनी ताब्यात घेत आहे. या जमिनी विकून या गरिबांचे पुनर्वसन केले गेले पाहिजे. कारण, या अवैध साम्राज्याच्या उभारणीला केवळ हे गरीब दोषी नाहीत. ग्लालबन्सीसारखे माफिया एका रात्रीत जन्माला येत नाहीत. अशा लोकांच्या पाठीशी भक्कम राजकीय पाठबळ असते. अनेक आमदार, खासदार, स्थानिक लोकप्रतिनिधी निवडणुकीत विजयासाठी अशा माफियांना जवळ करतात आणि मोबदल्यात त्यांच्या काळ्या धंद्यांना अभय मिळवून देतात. असे नसते तर तब्बल तीन दशकाहून मोठा काळ हे बिनकायद्याचे राज्य चालवणारा ग्लालबन्सी एकाही आमदार, खासदार,लोकप्रतिनिधींना खटकला नसता? यापैकी कुणाचीही ग्लालबन्सीच्या विरोधात बोलण्याची हिंमत का झाली नाही? अनेक पोलीस आयुक्त नागपुरात आले. त्यांचे लक्ष या प्रकाराकडे का गेले नाही? सरकार, प्रशासन, पोलीस अशा सर्वांनीच सोयिस्करपणे ग्लालबन्सीच्या या गैरप्रकाराकडे दुर्लक्ष केल्यानेच त्याची हिंमत वाढली व तो एकामागून एक जमिनी बळकावत गेला. पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम् यांचे मात्र विशेष अभिनंदन केले पाहिजे कारण त्यांनी धाडस दाखवित व सर्व दबाव झुगारून सर्व दबाव झुगारून ही कारवाई केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी न्यायाच्या या लढाईत पोलिसांना पूर्ण स्वातंत्र दिले. अखेर हे माफियाराज उधळून लावण्यात आले. आता पुढे ग्लालबन्सीचे अवैध साम्राज्य खालसा झाल्याचा आनंद साजरा करतानाच ज्यांची घरे गेली त्यांच्यासाठी ग्लालबन्सीच्या संपत्तीतून नवीन घरे कशी मिळवून देता येतील, याचाही विचार झाला पाहिजे. ही कारवाई इथेच थांबू नये दहशतीच्या बळावर असे अवैध साम्राज्य उभारणारा ग्वालबन्सी नागपुरात एकटाच नाही. त्याच्यासारख्या अनेकांनी गरीब व विवश माणसांच्या जमिनीवर कब्जा मिळवला आहे. त्यांनीही जवळच्या राजकारण्यांना धरून आपली बाजू सुरक्षित करून घेतली आहे. अशा भूमाफियांना खणून काढून त्यांच्याही मुसक्या आवळल्या पाहिजे आणि असे करताना कुणी व्होटबँकेचे स्मरण करून देत असेल तर त्यालाही त्याची जागा दाखवून दिली पाहिजे. ग्लालबन्सीवरच्या एका कारवाईने हे होणार नाही. त्यासाठी कारवाईची प्रक्रिया सलग चालत राहिली पाहिजे. कुठे आहेत कॅण्डलवाले? एरवी छोट्या-छोट्या गोष्टींसाठी व्हेरायटी, संविधान चौकातून कॅण्डल मार्च काढणारे, पेटून उठणारे जागृत समाजसेवक आणि त्यांच्या संघटना आता कुठे आहेत? शेकडो गरिबांची घरे उद्ध्वस्त झाली असताना अशा भूमाफियाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी, पोलिसांना पाठिंबा देण्यासाठी ही मंडळी कॅण्डल मार्च का काढत नाहीत, हा मोठाच प्रश्न आहे. मनपा, एनआयटीने आता तरी दक्ष व्हावे अशा जमिनी बळकवण्याचा या भूमाफियांना संसर्गजन्य आजार झाला आहे. या आजारावर कायमचा उपचार झाला पाहिजे. कारण, काल जे कुटुंब उद्ध्वस्त झाले त्यांच्यावर पुन्हा पाच-दहा वर्षांनी अशी वेळ येऊ नये. त्यामुळे जेव्हा अशा वस्त्या वसविण्याच्या हालचाली सुरू होतात तेव्हाच मनपा व एनआयटीने दक्ष राहून असा प्रयत्न उधळला पाहिजे.