शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अंधश्रद्धेने घेतला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 01:41 IST

अंधश्रद्धेने पछाडलेल्या एका कुटुंबाने ऐन दिवाळीच्या दिवशी शेजारच्या पिता-पुत्रावर प्राणघातक हल्ला चढवला. यामुळे मुलाचा मृत्यू झाला. तर, वडील मृत्यूशी झुंज देत आहेत.

ठळक मुद्देमुलाची हत्या, पिता गंभीर जखमी : दिवाळीच्या दिवशी विझला खैरे कुटुंबातील दिवा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंधश्रद्धेने पछाडलेल्या एका कुटुंबाने ऐन दिवाळीच्या दिवशी शेजारच्या पिता-पुत्रावर प्राणघातक हल्ला चढवला. यामुळे मुलाचा मृत्यू झाला. तर, वडील मृत्यूशी झुंज देत आहेत. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिप्टीसिग्नल भागात गुरुवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास हा थरारक प्रकार घडला.कुणाल दयालू खैरे (वय १९) असे मृताचे नाव असून, रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल असलेल्या त्याच्या पित्याचे नाव दयालू खैरे (वय ४५) आहे. पुंजाराम वाडीतील गल्ली नंबर ४ मध्ये दयालू खैरे राहतात. त्यांच्या बाजूलाच आरोपी प्रेमलाल बंडू कोटले (वय ४५) याचे घर आहे. दोघेही परिवार कळमना मार्केटमध्ये मजुरी करतात. गुरुवारी लक्ष्मीपूजनाचा दिवस असल्यामुळे कुणालने आपल्या होम थियेटरवर मोठ्या आवाजात गाणे वाजवायला सुरुवात केली. ते ऐकून आरोपी प्रेमलाल कोटले धावतच घराबाहेर आला. त्याने दयालूला घराबाहेर बोलवून ‘हमारे घर की नई बहू को देवी के गाणे सुनने के बाद उसके शरीरमे देवता आते है’, असे म्हणत गाणे वाजविण्यास मनाई केली. त्यावरून दयालू आणि प्रेमलालमध्ये वाद झाला. बाचाबाची सुरू असताना आरोपी प्रेमलालचा मुलगा आशिष ऊर्फ चेतराम (वय २०) घरात धावत गेला. त्याने घरातून भाजी कापण्याचा चाकू आणला आणि दयालूच्या पोटावर, छातीवर चाकूचे घाव घातले. ते पाहून दयालूचा मुलगा कुणाल वडिलांना वाचविण्यासाठी धावला. आरोपी प्रेमलालचा मुलगा लंगडा ऊर्फ मनोज आणि रोशन कोटले (वय २६) हेदेखील आले. त्यांनी कुणालवरही चाकूचे सपासप घाव घातले. त्यामुळे वडिलांसोबतच कुणालही रक्ताच्या थारोळ्यात पडला. पिता-पुत्राला मेयोत नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी कुणालला मृत घोषित केले.सोंगाने घेतला बळीसर्वत्र दिवाळीचा आनंद ओसंडून वाहत असताना घडलेल्या या घटनेमुळे पंजुराम वाडीत तीव्र शोककळा पसरली. कुणालची आई बिंदाबाई हिच्या तक्रारीवरून कळमन्याचे ठाणेदार महेश चाटे यांनी चारही आरोपींना अटक केली. त्यांना आज कोर्टात हजर करून त्यांचा २३ आॅक्टोबरपर्यंत पीसीआर मिळवला. आरोपी प्रेमलालच्या मुलाचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले. त्याच्या सुनेच्या अंगात कथित देव यायचा. या सोंगामुळेच कुणालचा बळी गेला.