शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लूने दोघांचा बळी

By admin | Updated: September 26, 2015 02:54 IST

बदलत्या वातावरणामुळे विषाणूंचा विळखाही वाढत आहे. शुक्रवारी मेडिकलमध्ये एका युवकाचा तर एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

नागपूर : बदलत्या वातावरणामुळे विषाणूंचा विळखाही वाढत आहे. शुक्रवारी मेडिकलमध्ये एका युवकाचा तर एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या दोघांची प्रकृती सुरुवातीपासून अत्यवस्थ असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शहरात गेल्या २६ दिवसांत स्वाईन फ्लूने सात रुग्णांचा बळी घेतला आहे. रामकृष्ण भटकर (३०) रा. दर्यापूर, अमरावती व ताराबाई निपाणी (६४) रा. कळमना, नागपूर अशी मृतांची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार रामकृष्ण भटकर १२ सप्टेंबरपासून अकोला मेडिकल रुग्णालयात उपचार घेत होते. प्रकृतीत सुधार होत नसल्याने त्याला २१ सप्टेंबर रोजी नागपूर मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात भरती करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले, रामकृष्ण याची प्रकृती सुरुवातीपासूनच गंभीर होती. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळी ५.१५ वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ताराबाई निपाणी यांना २० सप्टेंबर रोजी मेडिकलमध्ये भरती करण्यात आले होते. २१ सप्टेंबर रोजी त्यांना स्वाईन फ्लू असल्याचे स्पष्ट झाले.गुरुवारी मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)