शहरं
Join us  
Trending Stories
1
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
2
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
3
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
4
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
5
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
6
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
7
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
8
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
9
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
10
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
11
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
12
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
13
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
14
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
15
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
16
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
17
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
18
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
19
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
20
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

कुलगुरू वंजारी विभागप्रमुखच

By admin | Updated: August 12, 2016 02:42 IST

मुंबई येथील ‘एसएनडीटी’ विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. शशिकला वंजारी यांची निवड होऊन महिना उलटून गेला आहे.

नागपूर विद्यापीठाचा प्रताप : ‘संकेतस्थळ’ कधी होणार ‘अपडेट’? योगेश पांडे नागपूर मुंबई येथील ‘एसएनडीटी’ विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. शशिकला वंजारी यांची निवड होऊन महिना उलटून गेला आहे. परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दृष्टीने त्या बहुतेक अजूनही विद्यापीठातच कार्यरत आहेत. म्हणूनच की काय विद्यापीठाच्या संकेतस्थळावर त्या अद्यापही पदव्युत्तर शिक्षणशास्त्र विभागाच्या प्रमुख असल्याचे दाखविण्यात येत आहे. केवळ डॉ.वंजारीच नव्हे तर आता विद्यापीठात नसलेले अनेक प्राध्यापक व अधिकारी अद्यापही संकेतस्थळावर विद्यमान म्हणूनच दिसत आहेत. ‘आॅनलाईन’ सुधारणांचे मोठमोठे दावे करणाऱ्या नागपूर विद्यापीठ संकेतस्थळाच्या बाबतीत अद्यापही हवे तसे प्रगत झालेले नाही हेच यातून स्पष्ट होेत आहे. ‘ई-रिफॉर्म्स’साठी नागपूर विद्यापीठाने अनेक सकारात्मक पावले उचलली. परंतु ‘आॅनलाईन’ सुधारणाचे मूलभूत अंग असलेल्या संकेतस्थळाचा मात्र हवा तसा विकास झालेला नाही. अनेकदा तर संकेतस्थळावर प्रशासनाच्या विविध अधिसूचना, परिपत्रके २ ते ३ दिवस उशिरा ‘अपडेट’ होताना दिसून येतात. यासंबंधात प्रशासनाकडून संबंधित अधिकाऱ्यांना कधीही जाब विचारला जात नाही हे विशेष. सद्यस्थितीत विद्यापीठाचे विविध विभाग व संलग्नित महाविद्यालयांत प्रवेश सुरू आहेत. अनेक विद्यार्थी विभागांची माहिती व्हावी यासाठी संकेतस्थळाचा आधार घेतात. परंतु बऱ्याच विभागांची सद्यस्थितीतील माहितीच उपलब्ध नाही. अनेक विभागांमध्ये तर २ ते ३ वर्षांअगोदरची माहिती दिसून येत आहे. विद्यापीठाद्वारे संचालित करण्यात येत असलेल्या ‘एलआयटी’ तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाची संकेतस्थळावरील ‘लिंक’च उघडत नाही. आश्चर्याची बाब म्हणजे शारीरिक शिक्षण विभागाबाबत तर काहीही माहिती उपलब्ध नाही. विनायक देशपांडे अद्यापही प्रभारी कुलगुरू संकेतस्थळावर विद्यापीठाच्या विविध पदव्युत्तर विभागांची माहिती उपलब्ध आहे. परंतु ही माहिती योग्य आहे की नाही याची चाचपणी करणारी कुठलीही यंत्रणा उपलब्ध नाही. माजी प्रभारी कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे हे अद्यापही विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू असल्याची ‘एमबीए’ विभागाच्या ‘लिंक’वर नोंद आहे. तर काही महिन्यांपूर्वी निवृत्त झालेले डॉ.भारथी हे अद्यापही गांधी विचारधारा विभागाचे प्रमुख असल्याचे दाखविण्यात येत आहे. लोकप्रशासन विभागाच्या प्रमुखपदी अद्यापही डॉ.नीलिमा देशमुख यांचेच नाव आहे. निवृृत्त व्यक्ती अद्यापही विभागप्रमुख नागपूर विद्यापीठाच्या बॅ.शेषराव वानखेडे महाविद्यालयातील ४२ लाख रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याचे सूत्रधार अद्यापही हाती लागलेले नाही. या प्रकरणात माजी प्राचार्या डॉ.रजनी कार्लेवार यांच्यावरदेखील पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. डॉ.कार्लेवार या निवृत्त होऊन २ ते ३ वर्ष झाली आहेत. परंतु अद्यापही महाविद्यालयाच्या प्राचार्या म्हणून त्यांचेच नाव संकेतस्थळावर दिसून येते. कुलसचिव कोण याची माहितीच नाही नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिवपदी पूरण मेश्राम यांची नियुक्ती होऊन वर्ष झाले आहे. परंतु विद्यापीठाच्या संकेतस्थळावर मात्र कुलसचिव कोण आहेत याची माहितीच उपलब्ध नाही. कुलसचिवांच्या ‘लिंक’वर ‘क्लिक’ केले असता चक्क विद्यापीठ गीत उघडत आहे.