शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर : काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 21:08 IST

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याची टीका अखिल भारतीय काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देकेंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील साडेपाच वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेची दिशाभूल केली आहे. आर्थिक मंदी, वाढती बेरोजगारी, कृषी क्षेत्रावरील संकटामुळे वाढलेल्या शेतकरी आत्महत्या, बँकिंग क्षेत्रापुढील संकट, महिलांची सुरक्षा असे गंभीर प्रश्न देशापुढे उभे ठाकले आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याची टीका अखिल भारतीय काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, अ‍ॅड. अभिजित वंजारी आदी उपस्थित होते.मागील ५० वर्षातील बेरोजगारीचा उच्चाक गाठला आहे. वाढत्या बेरोजगारीमुळे समाजात अशांतता निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. खासगी गुंतवणुकीपोटी औद्योगिक विकास घटला आहे. उत्पादनक्षेत्रातील वाढ उणे झाली आहे. नोटबंदीमुळे देशाचा विकास दर २ टक्केहून अधिक कमी झाला. जीएसटीच्या माध्यमातून लोकांवर कर आकारला जात आहे. नरेंद्र मोदी यांना लोकांनी मोठ्या अपेक्षा ठेवून निवडून दिले होते. परंतु चुकीच्या धोरणामुळे लोकांचा अपेक्षाभंग झाल्याचा आरोप पवन खेडा यांनी केला. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात ५ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत देशभरात काँग्रेस आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.फोन टॅप प्रकरणाची चौकशी व्हावी‘पेगॅसस’ या इस्रायली स्पायवेअरचा वापर करून काही अज्ञात लोकांनी जगभरात हेरगिरी केली. इस्रायली कंपनीने आम्ही सरकारी कंपनीलाच स्पायवेअरचा वापर करू देत असल्याचे स्पष्ट केले आहे. हा गंभीर प्रकार आहे. भारतातील कुणाकुणाचे फोन टॅप करण्यात आले याची चौकशी व्हावी, अशी मागणी पवन खेडा यांनी केली.राज्यात स्थिर सरकार गठित व्हावेराज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे.सरकारमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्याची हिंमत नाही. दुसरीकडे राज्यात नवीन सरकार गठित होण्याला विलंब होत आहे. हा प्रकार देशातील जनता बघत आहे. राज्यात स्थिर सरकार गठित व्हावे, अशी लोकांची इच्छा आहे. याबाबत लवकरच स्थिती स्पष्ट होईल. अशी अपेक्षा पवन खेडा यांनी व्यक्त केली. निवडणुकीत आयारामांना लोकांनी धडा शिकवल्याचे सातारा येथील निकालावरून स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसMediaमाध्यमे