रामटेक : शहरातील प्रत्येक दुकानदार व विविध वस्तूंच्या विक्रेत्यांसह त्यांच्याकडील नाेकरांना त्यांचे काेराेना निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगणे स्थानिक नगर परिषद प्रशासनाने अनिवार्य केले आहे. या प्रमाणपत्राची वैधता १५ दिवसाची राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
रामटेक शहरातील काेराेना संक्रमण काहीसे कमी हाेताना दिसून येत आहे. मात्र, संक्रमण व रुग्णसंख्येत वाढ हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांसाेबतच दुकानदार व त्यांच्याकडील नाेकरांनी काळजी घेणे आवश्यक आहे. ते काेराेना स्प्रेडर बनण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने शहरातील औषधी विक्रेते, किराणा दुकानदार व भाजीपाला विक्रेते तसेच त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या नाेकरांना त्यांची काेराेना टेस्ट करणे व निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगणे अनिवार्य केले आहे. या प्रमाणपत्रांची वैधता १५ दिवसाची ठेवण्यात आली आहे. लाॅकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा सुरू असून, संबंधितांनी या आदेशाचे व काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन करावे, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांनी केले आहे.