शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात निवडणुकीसाठी वाहने मिळेनात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 11:06 IST

या निवडणुकीसाठी १६१० वाहनांची आवश्यकता लागणार आहे. मात्र, विविध विभागांकडून वाहन देण्यास टाळाटाळ होत आहे. आजवर निवडणूक विभागाकडे केवळ २०० वाहनेच विविध विभागांकडून जमा झाली आहे.

ठळक मुद्देआवश्यकता १६१० वाहनांची, आजवर २०० वाहनेच जमा -तर अधिकाऱ्यांवर शिस्तभंग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, येत्या २१ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील १२ ही विधानसभा मतदार संघासाठी मतदान होऊ घातले आहे. या निवडणुकीसाठी १६१० वाहनांची आवश्यकता लागणार आहे. मात्र, विविध विभागांकडून वाहन देण्यास टाळाटाळ होत आहे. आजवर निवडणूक विभागाकडे केवळ २०० वाहनेच विविध विभागांकडून जमा झाली आहे. विनंती करुनही वाहन देण्यास टाळाटाळ केल्यामुळे येत्या काळात अशा अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाईही देखील करण्याची तयारी निवडणूक विभागाने चालविली असल्याची माहिती आहे.निवडणुकीदरम्यान होणाऱ्या प्रचार सभेवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच इतर कामासाठी निवडणूक विभागाला १६१० वाहनांची आवश्यक आहे. यात जीप, बस, ट्रक, अ‍ॅम्ब्युलन्स, अग्निशमनच्या वाहनांचा समावेश आहे. यात काही वाहने कंत्राटी पध्दतीनेही घेण्यात येणार असून काही वाहने शासकीय विभागांकडून घेण्यात येणार आहे. आजवर विभागाकडे जवळपास २०० वाहन जमा झाले असल्याची माहिती आहे. अनेक शासकीय विभागांच्या प्रमुखांना वारंवार पत्रव्यवहार व फोन करुनही त्यांच्याकडून वाहन देण्यास टाळाटाळ होत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम, वनविभागातील जवळपास १०० बड्या अधिकाऱ्यांकडून वाहन देण्यासाठी टाळाटाळ होत असल्यामुळे याविरुध्द वाहन जप्तीची मोहीम राबविण्यात आली. यादरम्यान त्या अधिकाऱ्यांची वाहने भर रस्त्यात जप्त करुन त्यांना आहे त्या ठिकाणीच वाहनातून खाली उतरवून वाहन निवडणूक प्रशासनाने आपल्या ताब्यात घेतल्याची माहिती आहे.राष्ट्रीय कामासाठी वाहन देण्यास टाळाटाळ होत असल्याने आता प्रशासनाने थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वाहन देण्यास टाळाटाळ होत असल्याने जप्तीची कारवाई निवडणूक प्रशासनाकडून सुरूच आहेत. तर ज्या ज्या विभागांकडून अद्यापही वाहने जमा करण्यात आली नाही, त्यांना लवकरात लवकर निवडणूक प्रशासनाकडे (विभागाकडे) वाहन जमा करण्याच्या सूचनाही करण्यात आल्याची माहिती आहे. जिल्हा निवडणूक विभागाने वाहन जप्तीसाठी जिल्ह्यात सहा पथक तयार केले असून यात वाहतुक पोलीस, आरटीओ तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक