शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
2
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
3
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
4
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
5
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
6
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
7
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
8
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
9
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
10
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
11
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
12
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
13
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
14
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
15
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
16
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
17
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार
18
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा टीझर प्रदर्शित, वरुण धवन दिसला बाहुबली अवतारात
19
मुलीने बॉयफ्रेंडशी लग्नाचा तगादा लावला, बापाने लेकीचा आवाज बंद केला; मृतदेह लटकवून वेगळाच बनाव रचला 
20
ट्रम्प टॅरिफच्या संकटातही भारताची आर्थिक गाडी सुस्साट! GDP च्या वाढीत चीनलाही टाकलं मागे

तलावांकडे वाहनांना ‘नो एन्ट्री’

By admin | Updated: September 7, 2014 00:51 IST

गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान शहरातील फुटाळा तलाव, गांधीसागर, नाईक तलाव, कोराडी तलाव, कळमना खदान आणि संजय गांधीनगर जवळील खदान आदी ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी होत असते.

गणेशमूर्ती विसर्जन : वाहतुकीच्या मार्गात बदल नागपूर : गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान शहरातील फुटाळा तलाव, गांधीसागर, नाईक तलाव, कोराडी तलाव, कळमना खदान आणि संजय गांधीनगर जवळील खदान आदी ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर वाहतुकीला आणि भाविकांना कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. विसर्जन करणाऱ्या तलाव परिसरात गणेशमूर्ती असलेल्या वाहनांनाच प्रवेश राहील. इतर वाहनांना तलाव परिसरात बंदी घालण्यात आली आहे. फुटाळा तलाव लकडगंज, कोतवाली, तहसील, अजनी, गणेशपेठ व इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गांधीसागर मार्गे सुभाष रोडने फुटाळा तलाव येथे विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशमूर्ती आग्याराम देवी, कॉटन मार्केट चौक, लोखंडी पूल, मानस चौक, मॉरिस कॉलेज टी पॉर्इंट, संविधान चौक, सत्कार गेस्ट हाऊस, लिबर्टी टी पॉर्इंट, सी.के. नायडू पुतळा, सदर पोलीस स्टेशन, जपानी गार्डन, वेकोलि कार्यालय, शासकीय दूध डेअरी, तेलंगखेडी हनुमान मंदिर, ते फुटाळा तलाव या मार्गाने येतील. गणेशमूर्ती ठेवलेल्या वाहनांव्यतिरिक्त इतर वाहनांना हनुमान मंदिरापासून फुटाळा तलावाकडे प्रवेश बंद करण्यात आला आहे. सदर वाहने तेलंगखेडी येथील हनुमान मंदिर समोरील मत्स्य विज्ञान महाविद्यालयजवळून शिवमंदिरकडे तसेच सीपी क्लबकडे जाणाऱ्या दोन्ही रस्त्यांच्या बाजूला पार्क करता येतील. सेंट्रल एव्हेन्यू या मार्गाने येणारे गणपती रेल्वे ओव्हर ब्रिजवरून , सदर मार्गे फुटाळा तलावाकडे जातील. घरगुती व लहान गणपतींच्या मूर्ती वायुसेनानगर रोडवरील टी पॉर्इंट येथे उतरवण्यात येतील. रिकामी वाहने परत जातील. मोठे गणपती वाहनासह तलावाकडे नेऊन विसर्जित केल्या जातील. वासुसेना कमांड आॅफिस मुख्य दारापासून फुटाळा तलावाकडे गणेश मूर्ती घेऊन जाणाऱ्या वाहनाव्यतिरिक्त सर्व प्रकारच्या वाहनांना निर्बंध घालण्यात आलेले आहे. फुटाळा जंक्शनकडून फुटाळा तलावाकडे येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आले आहे. अमरावतीकडून शहराकडे येणारी जड वाहतूक वाडी टी पॉर्इंटकडून रिंगरोडने हिंगणा नाका मार्गे जातील. गांधीसागर तलाव इतवारी भागातून येणारे घरगुती गणपती अग्रसेन चौक, गांधी गेट महाल, टिळक पुतळा ते गणेश चौकमार्गे विसर्जनासाठी येतील. टिळक पुतळा ते गांधीगेट व गांधीगेट ते चिटणीस पार्ककडे जाणाऱ्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आलेली आहे.तसेच मौलाना नातिक चौक ते चिटणीस पार्क हा रस्ता दोन्ही बाजूच्या रहदारीकरिता बंद करण्यात आलेला आहे. तसेच आग्याराम देवी चौक ते एम्प्रेस मिल टी पॉर्इंटकडे जाणाऱ्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. नाईक तलाव पाचपावली भागातून श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्याकरिता येणारे घरगुती गणपती कमाल चौक, पाचपावली पोलीस स्टेशन, ते ठक्करग्राम, दिनकर कॉलनीमार्गे पंचकमिटी टी पॉर्इंटपर्यंत येतील. रिकामे वाहने त्याच मार्गाने परत जातील. राऊत चौक ते मस्कासाथ, भारतमाता चौक ते पिवळी मारबत रोडवर सर्वप्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. सक्करदरा तलाव छोटा ताजबाग ते भांडे प्लॉट व भांडे प्लॉट ते छोटा ताजबागकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. याशिवाय बिनाकी मंगळवारी, कळमना तलाव, संजय गांधीनगर खदान, कोराडी तलाव या ठिकाणी विसर्जनासाठी फारशी गर्दी नसल्याने तेथील वाहतूक ही आवश्यकतेनुसार वळविण्यात येईल. सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंह यांनी वाहतुकीत बदल करण्याची अधिसूचना जारी केली असून, ही अधिसूचना १० सप्टेंबरपर्यंत सकाळी ६ वाजेपर्यंत अमलात राहील.