शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
2
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
3
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
4
Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी
5
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
6
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
7
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
8
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
9
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
10
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
11
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
12
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
13
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
14
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
15
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
16
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
17
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
18
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
19
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
20
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती

रेल्वेस्थानकावर वाहन चोरीचे सत्र कायमच

By admin | Updated: November 8, 2014 02:50 IST

नागपूर रेल्वेस्थानकावर पश्चिमेकडील भागात आरपीएफ ठाण्यासमोर शासकीय वाहनांच्या पार्किंगची जागा आहे.

नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर पश्चिमेकडील भागात आरपीएफ ठाण्यासमोर शासकीय वाहनांच्या पार्किंगची जागा आहे. परंतू येथून सातत्याने जानेवारी महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत ११ दुचाकी चोरीला गेल्या असल्यामुळे रेल्वे कर्मचारी आणि नागरिक भयग्रस्त झाले आहेत. या चोऱ्या रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यासमोर होत असून लोहमार्ग पोलिसही याबाबत काहीच उपाययोजना करण्यास तयार नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.नागपूर रेल्वेस्थानकावर वाहन चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे. रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात रेल्वे सुरक्षा दलाचे ठाणे आहे. या ठाण्याच्या समोर शासकीय वाहनांच्या पार्किंगची जागा आहे. येथे रेल्वे कर्मचारी, प्रवासी, आरपीएफचे जवान आपल्या दुचाकी उभ्या करतात. येथे कुठलाच रेल्वे कर्मचारी उपस्थित राहत नाही. याच बाबीचा फायदा घेऊन या भागात वाहन चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे. जानेवारी २०१४ पासून नोव्हेंबर २०१४ दरम्यान या पार्किंगमधून तब्बल १० दुचाकी चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती आहे. दोन दिवसापूर्वी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात पॉईंटमन म्हणून कार्यरत असलेल्या संघपाल धनविजय (५१) रा. भगवाननगर नागपूर या रेल्वे कर्मचाऱ्याची दुचाकी चोरीला गेली होती. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा संकोच कालीचरण गायकवाड (२२) रा. इमामवाडा झोपडपट्टी यांची स्प्लेंडर प्लस क्रमांक एम. एच. ३१ डब्लु. एस. ७४६९ २८ आॅक्टोबरला चोरीला गेली. तो आपल्या मामाला सोडण्यासाठी रेल्वेस्थानकावर आला होता. येथून नेहमीच दुचाकी चोरीला जाऊनही लोहमार्ग पोलीस त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे वाहन चोरट्यांचे चांगलेच फावत आहे. (प्रतिनिधी)