शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहात बनणार वाहन उपकरणे

By admin | Updated: October 3, 2016 02:49 IST

मध्यवर्ती कारागृहातील कैदी फर्निचर, हँडलूमच्या वस्तू, ‘बेकरी प्रोडक्ट’ या व्यतिरिक्त काहीही तयार करू शकत नाही, असा सर्वसाधारण समज आहे.

योगेश पांडे / विशाल महाकाळकर ल्ल नागपूरनागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैदी फर्निचर, हँडलूमच्या वस्तू, ‘बेकरी प्रोडक्ट’ या व्यतिरिक्त काहीही तयार करू शकत नाही, असा सर्वसाधारण समज आहे. परंतु कारागृहातील कैदी आता हा समज मोडित काढणार आहेत. एकेकाळी गुन्ह्यांनी काळवंडलेले हात आता चक्क चारचाकी वाहनांसाठी आवश्यक उपकरणांची निर्मिती करताना दिसून येणार आहेत. नागपूर कारागृह प्रशासन व एका खासगी एजन्सीकडून यासंदर्भात पुढाकार घेण्यात आला आहे. तज्ज्ञांऐवजी कारागृहातील प्रशिक्षित कैदी उपकरणांचे उत्पादक बनणार असून यांची विक्री देशातील नामांकित वाहन कंपनीला करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कैद्यांकडून वाहन उपकरणे तयार करवून घेणारे राज्यातील हे दुसरेच कारागृह ठरणार आहे हे विशेष.अनेकदा क्षणिक रागापोटी हातून गुन्हा घडतो व कारागृहात कैद्याचे आयुष्य जगावे लागते. कारागृहातून बाहेर आल्यानंतर कैद्यांना स्वत:ची उपजीविका भागविण्यासाठी काय करावे हा मोठा प्रश्न असतो. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांचे पुनर्वसन व्हावे यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. नागपूर मध्यवर्ती कारागृहात आता यापुढचे पाऊल टाकले जाणार आहे. आता येथील कैदी कारागृहातच नामांकित वाहन कंपनीसाठी उपकरणे तयार करणार आहेत.अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापरनागपूर : कैद्यांना यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येत असून लवकरच येथे ‘प्रोडक्शन युनिट’ सुरू करण्यात येणार आहे. पुण्याहून २ तज्ज्ञ सुमारे ३० कैद्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देत आहेत. तांत्रिक पद्धतीचे हे प्रशिक्षण असून शिक्षित कैद्यांचा याकडे जास्त ओढा दिसून येत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ‘वायरिंग हारनेस असेंब्ली’ या युनिटची कारागृहात सुरुवात करण्यात येईल. युनिटमध्ये प्रामुख्याने ‘वायरिंग’ तसेच ‘क्लच’ व ‘गेअर’साठी आवश्यक उपकरण तसेच सुट्या भागांची निर्मिती करण्यात येईल. या ‘युनिट’मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार असून कैद्यांना एखाद्या कंपनीत काम केल्याचा अनुभव येणार आहे.शिक्षित कैद्यांचा ओढा जास्तनागपूर मध्यवर्ती कारागृह अधीक्षक योगेश देसाई यांना विचारणा केली असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. नागपूर कारागृहात कैद्यांना कामाची कमतरता नाही. सुतार कामासंदर्भात तर कारागृहाकडे प्रचंड ‘आॅर्डर्स’ आहेत. परंतु अनेकदा शिक्षित कैद्यांना सुतार काम करणे आवडत नाही. वाहनांची उपकरणे बनविण्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण लागते व त्याकरिता शिक्षण आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षित कैद्यांचा या नव्या कामाच्या प्रशिक्षणाकडे ओढा जास्त आहे, असे त्यांनी सांगितले. संबंधित कंपनीचे प्रशिक्षण पूर्ण झाले की ‘युनिट’मध्ये उत्पादन सुरू होईल. उत्पादनांचा दर्जा सर्वोत्तम असावा यावर भर देण्यात येत असल्याची माहिती देसाई यांनी दिली.(प्रतिनिधी)