शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

भाजी विक्रेत्या तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 01:22 IST

जरीपटकाच्या मंगळवारी बाजारात जुन्या वैमनस्यातून आरोपींनी एका भाजी विक्रेत्या युवकाचा खून केला. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.

ठळक मुद्देतिघांना अटक : जरीपटका परिसरात खळबळ, जुन्या वैमनस्यातून घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जरीपटकाच्या मंगळवारी बाजारात जुन्या वैमनस्यातून आरोपींनी एका भाजी विक्रेत्या युवकाचा खून केला. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.समीर ऊर्फ सोनु शहा (२१) रा. वनदेवीनगर असे मृताचे नाव आहे. जरीपटका पोलिसांनी खुनाचे सूत्रधार ऋषभ राजू खापेकर (१९) रा. बिनाकी मंगळवारी, शेख फय्याज ऊर्फ बाबू साहब (२१) रा. यशोधरानगर आणि त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारास अटक केली आहे. सोनू आठवडी बाजारात टमाटर विकत होता. त्याची ऋषभसोबत मैत्री होती. तीन महिन्यापूर्वी पैशावरून दोघात वाद झाला होता. वाद झाल्यानंतर दोन दिवसांनी ऋषभ, बाबू साहबला घेऊन सोनूच्या घरी आला होता. त्यांनी सोनूवर हल्ला केला होता. मदतीसाठी आलेल्या सोनूच्या भावालाही त्यांनी जखमी केले होते.या हल्ल्यात बाबू साहबही गंभीर जखमी झाला होता. याबाबत यशोधरानगर ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. त्यानंतर आरोपींचा सोनूसोबत वाद सुरू होता. सोनू आपल्याला इजा पोहोचवू शकतो, अशी आरोपींना भीती होती. सोनू हा वाद विसरला होता. आरोपी अनेक दिवसांपासून सोनूला धडा शिकविण्याच्या तयारीत होते. मंगळवारी सोनू आठवडी बाजारात टमाटर विकत होता. रात्री १०.३० वाजता बाजार बंद होण्याची वेळ झाल्यामुळे सोनू आपल्या मित्रासोबत बसला होता. त्याचवेळी एक युवक सोनूला बोलविण्यासाठी आला. सोनू त्याच्यासोबत सागर बीअर बारकडे गेला.याच दरम्यान आरोपीही त्याचा शोध घेत तेथे पोहोचले. त्यांनी सोनूला घेरले. त्याचा जागेवरच शस्त्रांनी खून केला. या घटनेमुळे बाजारात एकच खळबळ उडाली. भाजी विक्रेते सामान गोळा करून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सोनूला मेयो रुग्णालयात पोहोचविले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ऋषभ खापेकर रेल्वेगाडीत खाद्यपदार्थ विकतो. बाबू साहब डोबीचा गुन्हेगार आहे. दोघांविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. हल्ला करताना आरोपींची संख्या अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. ऋषभ आणि बाबू साहब सात ते आठ साथीदारांसह सोनूला शोधत होते. परंतु पोलीस तीन आरोपी असल्याचे सांगत आहेत. सोनूच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे.