शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

भाज्या महाग, बजेट बिघडले

By admin | Updated: June 24, 2014 00:59 IST

महागाईची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसत असून दरदिवशी जीवनावश्यक वस्तू महाग होत आहेत. भाज्यांच्या वाढत्या किमतीमुळे गृहिणींच्या बजेटमध्ये वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी खरीप

कोथिंबीर ५० रुपयांवर : कांदे-बटाटे आटोक्यातनागपूर : महागाईची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसत असून दरदिवशी जीवनावश्यक वस्तू महाग होत आहेत. भाज्यांच्या वाढत्या किमतीमुळे गृहिणींच्या बजेटमध्ये वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी भाज्यांची लागवड थांबविली आहे. नवीन लागवड आॅगस्टपासून सुरू होऊन नवीन माल दसरा-दिवाळीपर्यंत बाजारात येईल. तोपर्यंत ग्राहकांना भाज्या महागच मिळतील.वांगे, पालक, कोहळे या भाज्यांचे दर आटोक्यात असून बहुतांश महाग भाज्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे बाजारात चित्र आहे. भाज्या महागल्याने स्वयंपाकघरात कडधान्याचा वापर होऊ लागला आहे. आवक कमी असल्याने किरकोळच नव्हे तर ठोक बाजारातही भाज्या महाग आहेत. किरकोळमध्ये सांबार ५० ते ६० रुपये किलो आणि हिरवी मिरची ४० रुपयांवर गेल्याने भाज्यांचा तडका तिखट झाला आहे. किरकोळमध्ये फुलकोबी २५ रुपये आणि टमाटर ४० रुपयांवर पोहोचल्याची माहिती महात्मा फुले भाजी बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतला दिली. बाहेरून आवक कमीकॉटन मार्केट ठोक भाजी बाजारात संगमनेर व नाशिकहून टमाटर, गोंदिया आणि भंडाऱ्यातून भेंडी, छिंदवाडा व औरंगाबाद येथून फुलकोबी आणि परतवाडा, जगदलपूर, रायपूर येथून हिरव्या मिरचीची आवक आहे. नागपूरलगतच्या परिसरातून चवळी भाजी, पालक, भेंडी, कारले आदींची आवक आहे. कॉटन मार्केटमध्ये लहानमोठ्या १५० गाड्या येत आहेत. या बाजारातून अन्य ठिकाणी भाज्या विक्रीसाठी जात असल्याने सध्या भाज्यांचा तुटवडा जाणवत असल्याचे अडतियांनी सांगितले. कांदा-बटाट्याचे दर स्थिरसध्या कळमन्यात कांदा आणि बटाट्याची आवक अपेक्षेनुरूप असल्याने भाव स्थिर आहेत. जूनच्या अखेरीस भाव वधारतील, अशी शक्यता कळमन्यातील आलू-कांदा असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. कळमन्यात लाल कांदा ५०० ते ६५० रुपये मण (४० किलो) आणि पांढरा कांदा ७०० ते ८०० रुपये मण भाव आहेत. किरकोळमध्ये दर्जानुसार १५ ते २५ रुपयांदरम्यान भाव आहेत. कळमन्यात दररोज ४० ट्रक लाल आणि पांढरा कांदा विक्रीस येतो. अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याची साठवणूक केली आहे. आवश्यतेनुसार ते विक्री करतात. त्याचाही परिणाम भाववाढीवर होत असतो. सध्या विदर्भात कांद्याची लागवड वाढली आहे. अकोला, अमरावती आणि बुलडाणा या जिल्ह्यासह नाशिक, मनमाड, अहमदनगर येथून कांदे विक्रीसाठी येत आहेत. भाज्यांच्या वाढीव किमतीचा परिणाम बटाट्यांच्या किमतीवर दिसून येतो. किरकोळ बाजारात दर्जानुसार २२ ते २५ रुपये किलो भाव आहे. ठोक बाजारात भाव प्रति किलो १४ ते १९ रुपयादरम्यान आहेत. भाज्यांच्या किमती वाढल्यास बटाट्याची मागणी वाढेल, परिणामी किमत वधारतील, असे वसानी म्हणाले. सध्या कळमन्यात छिंदवाडा, आग्रा, कानपूर, अहमदाबाद येथून दररोज १६ ते २० ट्रकची आवक आहे. रविवारी बटाट्याचे भाव ६५० ते ७२५ रुपयांदरम्यान (४० किलो) होते. (प्रतिनिधी)