शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

वेगाशी स्पर्धा नडली

By admin | Updated: December 26, 2016 02:23 IST

वेगाशी स्पर्धा करीत नागपूरकडे निघालेली कार अनियंत्रित झाल्याने दुभाजकावरून उसळून विरुद्ध मार्गाने येणाऱ्या ट्रकवर आदळली.

दुभाजकावरून उसळलेली कार ट्रकवर आदळली हिंगणा/ नागपूर : वेगाशी स्पर्धा करीत नागपूरकडे निघालेली कार अनियंत्रित झाल्याने दुभाजकावरून उसळून विरुद्ध मार्गाने येणाऱ्या ट्रकवर आदळली. त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात कारमधील चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर ट्रकचालक गंभीर जखमी आहे. नागपूर - वर्धा - चंद्रपूर महामार्गावरील जामठा शिवारात रविवारी दुपारी ३.१० वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. यामुळे काही वेळ मार्गावरची वाहतूक प्रभावित झाली होती. एमएच-४० / एफ-०९५२ क्रमांकाच्या रिटज् कारमध्ये बसून चार जण वर्धेहून नागपूरकडे येत होते. कार मर्यादेपेक्षा जास्त वेगात होती. नागपूरनजीकच्या जामठा शिवारात पोहोचताच ओव्हरटेकच्या प्रयत्नात कारचालकाचा ताबा सुटला आणि अनियंत्रित कार दुभाजकावरून उसळून विरुद्ध मार्गाने येणाऱ्या आयशर ट्रकवर (एमएच-४९/९१९२) आदळली. त्यानंतर तेवढ्याच वेगात ही कार परत वर्धा मार्गावर येऊन पडली. कारचा वेग आणि धडक एवढी जोरदार होती की आयशर ट्रकही उलटला अन् कारचे इंजिन तुटून १५ ते २० फूट दूर वेगळे होऊन पडले. कारमधील चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर ट्रकचालक राकेश शंभरकर यालाही या अपघातात जबर दुखापत झाली.(प्रतिनिधी) वाहतुकीला अडथळा या भीषण अपघाताने दोन्ही वाहने दोन बाजूच्या रस्त्यावर उलटून पडल्यामुळे नागपूर - वर्धा - चंद्रपूर मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. माहिती कळताच बुटीबोरी, हिंगणा आणि सोनेगाव तसेच गस्तीवरील पोलीस घटनास्थळी धावले. त्यांनी दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. मात्र तोपर्यंत दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कारमध्ये बसलेल्या चारही जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची ओळख लवकर पटू शकली नाही.मृतापैकी एकाच्या खिशात आधार कार्ड होते. मात्र, मृतांचे चेहरे बिघडल्याने त्यांची ओळख पटविण्यासाठी हिंगणा पोलिसांनी कारच्या नंबरवरून प्रयत्न सुरू केले. त्यानंतर तीन तासानंतर आनंद रामसिंग पारधी (वय २५) , चंद्रशेखर ऊर्फ बंटी जयचंद चव्हाण (वय २४, रा. खापरी, पुनर्वसन वसाहत) वंशपती शंकर पटेल (वय ३०, रा.भोपाळ, मध्य प्रदेश) आणि रवी रहांगडाले (वय २५ रा. खापरी, पुनर्वसन वसाहत) यांची ओळख पटली.