शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत परिवाराच्या शुभेच्छांनी भारावले वीरा साथीदार

By admin | Updated: September 25, 2015 03:33 IST

‘आॅस्कर’साठी नामांकन झालेल्या ‘कोर्ट’ चित्रपटातील मुख्य अभिनेते वीरा साथीदार यांचे ‘लोकमत भवन’ येथे अभिनंदन करताना लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्र्डाचे चेअरमन व खासदार विजय दर्डा.

‘कोर्ट’ ला आॅस्कर मिळणारच

‘आॅस्कर’साठी नामांकन झालेल्या ‘कोर्ट’ चित्रपटातील मुख्य अभिनेते वीरा साथीदार यांचे ‘लोकमत भवन’ येथे अभिनंदन करताना लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्र्डाचे चेअरमन व खासदार विजय दर्डा.नागपूर : महाराष्ट्राला उच्चकोटीची परंपरा लाभली आहे. येथील महान संतांनी समाजजीवन समृद्ध केले. साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातही या राज्याने नवे मानदंड निर्माण केले. अलीकडच्या काही वर्षांत मराठी सिनेमासुद्धा जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व करीत आहेत. ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाचे आॅस्कर पुरस्कारासाठी नामांकन होणे हा मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी बहुमानाचा क्षण आहे. ‘कोर्ट’ला ‘आॅस्कर’ मिळणारच, असा विश्वास लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केला. ‘आॅस्कर’ पुरस्कारासाठी नामांकन झालेल्या ‘कोर्ट’ या चित्रपटातील मुख्य अभिनेते वीरा साथीदार यांनी गुरुवारी ‘लोकमत भवन’ला सदिच्छा भेट दिली. यावेळी खा. दर्डा यांनी साथीदार यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले, तसेच या चित्रपटाच्या टीमला आॅस्करसाठी लोकमत परिवारातर्फे शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांनी वीरा साथीदार अक्षरश: भारावून गेले होते. दर्डा पुढे म्हणाले, मराठी चित्रपटांना प्राधान्य मिळावे, ही लोकमतची पूर्वीपासून भूमिका राहिली आहे. यातूनच ‘लोकमत एन्टरटेनमेंट’ने २०१० मध्ये ‘जेता’ हा मराठी चित्रपट निर्माण केला होता. या चित्रपटाचा नायक नागपुरातील सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, ही नागपूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे गौरवोद्गार खा. दर्डा यांनी यावेळी काढले. (प्रतिनिधी)