शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

वीणा बजाज यांना न्यायालयीन कोठडी

By admin | Updated: October 10, 2015 02:54 IST

भ्रष्टाचाराच्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर अपसंपदा जमविल्याप्रकरणी जरीपटका येथील ओंकारलाल सिंधू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका वीणा दीपक बजाज ...

नागपूर : भ्रष्टाचाराच्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर अपसंपदा जमविल्याप्रकरणी जरीपटका येथील ओंकारलाल सिंधू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका वीणा दीपक बजाज यांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश के.जी. राठी यांच्या न्यायालयाने न्यायालयीन कोठडी रिमांड सुनावून त्यांची कारागृहाकडे रवानगी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी वीणा बजाज यांना ६ आॅक्टोबर रोजी अटक करून त्यांचा ९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला होता. वीणा बजाज यांचे पती दीपक खूबचंद बजाज यांच्याविरुद्ध अपसंपदेबाबतचा तपास सुरू असताना वीणा बजाज यांच्याविरुद्ध बऱ्याच तक्रारी आणि पुरावे आढळून येताच त्यांना अटक करण्यात आली होती. दीपक बजाज यांना सचिव या नात्याने शाळेत शिक्षकांची नेमणूक करण्याचे अधिकार असताना त्यांनी प्रतीक घोडे नावाच्या चित्रकला शिक्षकाची नेमणूक करण्याचे अधिकार आपली पत्नी वीणा बजाज यांना दिले होते. वीणा बजाज यांनी एकटीने ५ नोव्हेंबर २०१४ रोजी घोडे यांची मुलाखत घेतली होती. त्यांनी प्रतीक घोडेला १० लाखांची मागणी केली होती. त्यापैकी तीन लाख रुपये आधी घेतले होते.कोऱ्या स्टॅम्पपेपरवर घोडे यांची सहीही घेतली होती. घोडे हा वारंवार मागणी करूनही सात लाख रुपये देत नसल्याने त्याला राजीनामा देण्यासाठी वारंवार धमक्या देऊन मानसिक त्रास देण्यात आला होता. पुढे तो पैसे देऊ न शकल्याने त्याला १० महिन्यांतच कामावरून काढून टाकण्यात आले होते. न्यायालयाने वीणा बजाज यांना न्यायालयीन कोठडी रिमांड सुनावताच त्यांच्या वकिलाने जामीन अर्ज दाखल केला. अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील गिरीश दुबे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)