शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

वीणा बजाज गजाआड

By admin | Updated: October 7, 2015 03:22 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सिंधू एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा वीणा बजाज यांना मंगळवारी दुपारी अटक केली.

एसीबीची कारवाई : सिंधू एज्युकेशन सोसायटीतील गैरव्यवहार नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सिंधू एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा वीणा बजाज यांना मंगळवारी दुपारी अटक केली. सोसायटीचे सचिव डॉ. दीपक बजाज यांच्या त्या पत्नी असून, डॉ. बजाज यांनाही लवकरच अटक केली जाईल असे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.पदाचा दुरुपयोग करून डॉ. दीपक बजाज आणि वीणा बजाज यांनी अनेक लोकांकडून लाचेच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम उकळल्याची आणि त्यातून मोठी मालमत्ता जमविल्याची तक्रार एसीबीला मिळाली होती. त्याची शहानिशा केल्यानंतर गेल्या आठवड्यात एसीबीच्या पथकाने डॉ. बजाज यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात धाड टाकून झडती घेतली.तब्बल तीन दिवस झाडाझडती घेतल्यानंतर एसीबीच्या पथकाला सुमारे ३२ लाखांची रोकड, ४८८ ग्राम सोने आणि ५.८५ किलो चांदी सापडली.याशिवाय त्यांच्याकडे नऊ वाहने आढळली. त्यात एक ५५ लाखांची आलिशान कारही आहे. घरातील फर्निचर तसेच अन्य संपत्तीचा हिशेब केल्यास ही मालमत्ता तीन कोटींच्या घरात जाते. ही मालमत्ता कशी जमवली, त्याची एसीबीला बजाज दाम्पत्याकडून माहिती मिळाली नाही. मात्र, त्यांच्या गैरव्यवहाराचे भक्कम पुरावे असलेली कागदपत्रे एसीबीने जप्त केली. त्यानंतर बजाज दाम्पत्याविरुद्ध अनेक तक्रारदारही पुढे आले. त्यामुळे एसीबीने जरीपटका ठाण्यात गुन्हा दाखल केला. अटक टाळण्यासाठी डॉ. बजाज यांनी कोर्टात धाव घेतली. मात्र, एसीबीने बजाज यांच्याविरोधात गैरव्यवहाराचे भक्कम पुरावे असल्याची तक्रार नोंदवल्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन मिळू शकला नाही. (प्रतिनिधी)धडपड व्यर्थ ठरलीअटक टाळण्यासाठी बजाज दाम्पत्यांनी अज्ञात ठिकाणी आश्रय घेण्यासाठी धडपड सुरू केली. मात्र, एसीबीचे अधीक्षक राजीव जैन यांच्या मार्गदर्शनाखाली बजाज यांच्या मागावर एक पथक होते. डीवायएसपी सुपारे, पीआय शेटे, पीआय मोनाली चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दुपारी ४ च्या सुमारास हैदराबाद हाऊस परिसरात वीणा बजाज यांना अटक केली. नंतर त्यांना जरीपटका ठाण्यात नेण्यात आले. डॉ. दीपक बजाज यांचा शोध सुरू असून, त्यांनाही लवकरच आम्ही अटक करू, असा विश्वास अधीक्षक राजीव जैन यांनी व्यक्त केला आहे.