शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

व्हीसीए पदाधिकाऱ्यांवर अखेर गुन्हे दाखल

By admin | Updated: February 1, 2017 02:15 IST

सुरक्षेसंदर्भातील अनेक महत्त्वपूर्ण बाबी दुर्लक्षित करून विना परवाना भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० सामना

पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका : आरोपींमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिवाचाही समावेश नागपूर : सुरक्षेसंदर्भातील अनेक महत्त्वपूर्ण बाबी दुर्लक्षित करून विना परवाना भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० सामना घेणाऱ्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (व्हीसीए) पदाधिकाऱ्यांवर अखेर पोलिसांनी मंगळवारी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले. आरोपींमध्ये व्हीसीएचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिवाचाही समावेश आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करताना पर्यावरण संरक्षण अधिनियमाचे उल्लंघन करणे आणि अनेकांचे जीव धोक्यात घातल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवला आहे. या घडामोडीमुळे क्रीडा वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, व्हीसीएने सुरक्षेसंदर्भातील बाबी दुर्लक्षित करून जामठ्यात विना परवानगीने आंतरराष्ट्रीय सामना घेतल्याचे वृत्त लोकमतने सोमवारच्या अंकात ठळकपणे प्रकाशित करून खळबळ उडवून दिली होती. तसेच व्हीसीए पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यताही व्यक्त केली होती, हे येथे विशेष उल्लेखनीय! उपसरपंचाने केली तक्रार ४दरम्यान, सामन्याच्या दिवशी डीजेचा कर्णकर्कश आवाज, गोंगाट, मोठ्या संख्येतील वाहनांच्या हॉर्नमुळे जामठा भागातील वृद्ध आणि आजारी नागरिक, विद्यार्थी यांना प्रचंड त्रास झाला. त्यामुळे व्हीसीए पदाधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करा, अशी मागणी करणारा तक्रार अर्ज सोमवारी जामठा येथील उपसरपंच कवडूजी ढेंगे (वय ४५) यांनी हिंगणा पोलीस ठाण्यात दिला. ४या तक्रार अर्जाच्या संबंधाने वरिष्ठ पातळीवर प्रदीर्घ विचारमंथन झाल्यानंतर मंगळवारी दुपारी हिंगणा पोलिसांनी पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या कलम १५ (१) अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करताना आरोपींमध्ये व्हीसीएचे अध्यक्ष अ‍ॅड. आनंद जयस्वाल, उपाध्यक्ष प्रशांत वैद्य, सचिव भूपेंद्रसिंग भट्टी, सुरक्षेसंबंधीची जबाबदारी सांभाळणारे आनंद देशपांडे आणि संचालक मंडळातील आणखी काही पदाधिकारी यांचा समावेश केला. ४पर्यावरण संरक्षण कायदा-१९८६ कलम १५ उपकलम (१) मध्ये पाच वर्षांपर्यंत कारावास किंवा एक लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा दिल्या जाऊ शकतात. शिक्षा झाल्यानंतरही कायद्याचे उल्लंघन सुरूच राहिल्यास प्रत्येक दिवसामागे पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. व्हीसीएच्या जामठा स्टेडियमवर रविवारी रात्री टी-२० चा आंतरराष्ट्रीय सामना पार पडला. हा सामना बघण्यासाठी देश-विदेशातील हजारो क्रिकेट रसिक येणार असल्याचा अंदाज असल्याने, सुरक्षेसंबंधाने पोलिसांनी व्हीसीए पदाधिकाऱ्यांना अनेक महत्त्वपूर्ण सूचना केल्या होत्या. प्रेक्षक हजारो वाहने आणतील त्यामुळे अपघात होऊ नये, कल्लोळ वाढू नये, कुणाला कोणत्याच प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून खास काळजी घेण्याचीही सूचना पोलिसांनी केली होती. मात्र व्हीसीए पदाधिकाऱ्यांनी त्याकडे पुरते दुर्लक्ष केले. व्हीसीएने सुरक्षेचे अनेक मुद्दे वाऱ्यावर सोडतानाच पोलिसांच्या सूचनाही धुडकावल्याने पोलिसांनी या सामन्याची परवानगी रद्द करीत असल्याचे लेखी पत्र व्हीसीए पदाधिकाऱ्यांना दिले. एवढेच नव्हे तर रविवारी सकाळी सामना सुरू होण्याच्या काही तासअगोदर पोलिसांनी व्हीसीए पदाधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत नियमाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला होता. मात्र व्हीसीए पदाधिकाऱ्यांनी त्याला दाद दिली नाही. त्यामुळे व्हीसीए पदाधिकाऱ्यांवर कोणत्या स्वरूपाची कारवाई करावी, यासंबंधाने वरिष्ठ पातळीवर गंभीर स्वरूपाची चर्चा सुरू होती.