शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मोकाट कुत्र्यांवर नसबंदीची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 22:27 IST

मागील काही वर्षांपासून नसबंदीचा उपक्रम बंद असल्याने नागपूर शहरात बेवारस कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे नागरिक त्रस्त असल्याने कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका १५ दिवसात नसबंदीचा उपक्रम पुन्हा राबविणार आहे.

ठळक मुद्देदोन संस्थांसोबत करार१५ दिवसात उपक्रमाला सुरुवात

आॅनलाईन लोकमतनागपूर : मागील काही वर्षांपासून नसबंदीचा उपक्रम बंद असल्याने नागपूर शहरात बेवारस कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे नागरिक त्रस्त असल्याने कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका १५ दिवसात नसबंदीचा उपक्रम पुन्हा राबविणार आहे. यासाठी दोन संस्थांसोबत करार करण्यात आला आहे.दरवर्षी शहरातील सात ते आठ हजार नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडतात. तसेच रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांमुळे घाण पसरते. मोकाट कुत्र्यांसंदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. याची दखल घेत महापालिका प्रशासन नसबंदीचा व्यापक उपक्रम राबविणार आहे.शहरात ९० हजार मोकाट कुत्रेनागपूर शहरात ८० ते ९० हजार मोकाट कुत्री आहेत. त्यामुळे नसबंदी केलेल्या कुत्र्यांची ओळख पटावी. यासाठी त्यांना निशाणी लावली जाणार आहे. नसबंदी झालेल्या कुत्र्यांचा कान कापणे अथवा बिल्ला लावण्याचा विचार आहे. मात्र बिल्ला पडण्याची शक्यता असते. त्यामुळे कान कापण्याचा विचार केला जात आहे.

शहरालगतच्या भागावर लक्षमोकाट कुत्र्यांची संख्या प्रामुख्याने शहरालगतच्या भागात जास्त व मध्यवर्ती भागात कमी भागात आहे. त्यामुळे नसबंदी उपक्रमाला या भागातून सुरुवात करण्याचा महापालिकेचा विचार आहे. मोकाट कुत्र्यांची संख्या अधिक असलेल्या भागावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. साधारणपणे नागरी लोकसंख्येच्या तुलनेत मोकाट कुत्र्यांची संख्या तीन टक्के असते. कुत्र्यांची प्रभागनिहाय गणना करताना प्रभागातील लोकसंख्या व कुत्र्यांची संख्या याची सरासरी संकलित केली जात आहे. यापूर्वी नसबंदी करण्यात आलेले, नसबंदी न झालेल्या कुत्र्यांचा डाटा तयार करणार आहे. सोबतच कुत्र्यांची लहान पिले व गर्भधारणा झालेल्या कुत्र्यांचीही माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. कोल्हापूर येथील व्हीटीएस फॉर अ‍ॅनिमल संस्थेवर गणनेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सभागृहातही दिली माहितीशहरातील मोकाट कुत्र्यांवर नसबंदी करण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. यासाठी प्रभागनिहाय डाटा संकलित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच महिनाभरात नसबंदीचा उपक्रम राबविला जाणार आहे, अशी माहिती पशुचिकित्सक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी सोमवारी सभागृहातही दिली होती.

 

टॅग्स :dogकुत्रा