शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

वनभवनातील तीन कर्मचाऱ्याचे अहवाल ‘निगेटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 00:29 IST

वनभवनातील एका कर्मचाºयाचा १३ जुलैला कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर अलीकडे पुन्हा एक कर्मचारी पॉझिटिव्ह आला. यामुळे वनभवनातील अधिकारी आणि कर्मचारी दहशतीमध्ये आहेत. दरम्यान, शुक्रवारी तीन कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी नेले होते. ते निगेटिव्ह आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वनभवनातील एका कर्मचाºयाचा १३ जुलैला कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर अलीकडे पुन्हा एक कर्मचारी पॉझिटिव्ह आला. यामुळे वनभवनातील अधिकारी आणि कर्मचारी दहशतीमध्ये आहेत. दरम्यान, शुक्रवारी तीन कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी नेले होते. ते निगेटिव्ह आले आहेत.वनभवनातील पब्लिसिटी विभागातील ४५ वर्षीय कर्मचाऱ्याचा १३ जुलैला कोरोनामुळे मृत्यू झाला होता. वनभवनाने दिलेल्या माहितीनुसार, हा कर्मचारी ३० जूनला व नंतर ८ जुलैला कार्यालयात आला होता. दरम्यानच्या काळात त्याची ड्यूटी जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आली होती. याच कार्यालयातील बजेट विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने उपचारासाठी दाखल केले होते. त्याची तपासणी केली असता तोसुद्धा पॉझिटिव्ह निघाला. विशेष म्हणजे हा कर्मचारी मृत पावलेल्या कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाणे व आणण्यासाठी सहकार्य करीत होता. या कर्मचाऱ्याचे पब्लिसिटी विभागात नेहमी येणे-जाणे असे. त्यामुळे त्याच्या संपर्कातील तीन कर्मचाऱ्यांचे नमुने शुक्रवारी घेण्यात आले. शनिवारी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या घटनेनंतर कार्यालय सॅनिटाइझ करण्यात आले. कार्यालयातील उपस्थितीवरही नियंत्रण आणण्यात आले. सोमवारनंतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती पुन्हा कमी केली जाणार असल्याची माहिती आहे.तीनही नमुने निगेटिव्ह आले आहेत. कार्यालय सॅनिटाइझ करण्यात आले आहे. आरोग्याच्या दृष्टीने सर्वतोपरी उपाययोजना केली जाईल. उपस्थितीसंदर्भातही सूचना दिल्या जातील. एन. रामबाबू, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख)‘त्या’ कर्मऱ्याच्या संपर्कात अजून किती ?पॉझिटिव्ह निघालेल्या बजेट विभागातील कर्मचाऱ्याच्या संपर्कात अजून किती कर्मचारी आले असावे, याचा अंदाज कुणालाच नाही. या कर्मचाºयाचे पब्लिसिटी विभागात नेहमी येणे-जाणे असायचे. यामुळे दोन्ही विभागांतील कर्मचारी धास्तावले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याforest departmentवनविभाग