शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

स्मरणशक्तीमध्ये वैष्णवी पोटेचा राष्ट्रीय विक्रम

By admin | Updated: June 27, 2017 02:04 IST

संत्रानगरीतील वैष्णवी पोटेने सोमवारी स्मरणशक्तीमध्ये राष्ट्रीय विक्रम केला. तिने १०० वस्तूंची नावे सरळ क्रमाने, उलट क्रमाने व मिश्र क्रमाने अचूकपणे सांगितली.

विविध क्रमाने सांगितली १०० वस्तूंची नावे : इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस्मध्ये होणार नावाची नोंदलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संत्रानगरीतील वैष्णवी पोटेने सोमवारी स्मरणशक्तीमध्ये राष्ट्रीय विक्रम केला. तिने १०० वस्तूंची नावे सरळ क्रमाने, उलट क्रमाने व मिश्र क्रमाने अचूकपणे सांगितली. तिच्या या विक्रमामुळे संत्रानगरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. संत्रानगरीचे नाव राष्ट्रीयस्तरावर पोहोचले. इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस्च्या २०१८ मधील आवृत्तीमध्ये या विक्रमाचा समावेश केला जाणार आहे.राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विशेष कार्य अधिकारी मनोहर पोटे यांची वैष्णवी कन्या होय. भवन्स शाळेमध्ये इयत्ता बारावीला असलेल्या वैष्णवीचा जन्म २३ जानेवारी २००१ रोजी झाला. ती लहानपणापासूनच चाणाक्ष बुद्धीची आहे. कोणत्याही गोष्टी तिला चटकन लक्षात राहतात. वैशाली कोडे यांच्या मुलीने राज्यघटनेतील आर्टिकल तोंडपाठ सांगण्याचा विक्रम केला. वैशाली कोडे यांनी पोटे कु टुंबाला वैष्णवीने राष्ट्रीय विक्रम करावा, यासाठी प्रोत्साहन दिले. तेथून वैष्णवीच्या विक्रमाची तयारी सुरू झाली. असा झाला विक्रमसिव्हिल लाईन्सस्थित चिटणवीस सेंटर येथे वैष्णवीची परीक्षा घेण्यात आली. इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस्चे पंच डॉ. मनोज तत्वादी यांनी विक्रमाचे परीक्षण केले. इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस्ने पेन, मोबाईल, फॅन, बुक, बोर्ड इत्यादी १०० वस्तूंच्या नावाची यादी पाठविली होती. वैष्णवीला ही यादी स्क्रीनवर १० मिनिटांसाठी दाखविण्यात आली. या वेळात वैष्णवीने सर्व वस्तूंची नावे स्मरणात घेतली. त्यानंतर ती प्रेक्षकांकडे पलटली. त्यावेळी स्क्रीनवरील नावे केवळ प्रेक्षकांना दिसत होती. स्क्रीन वैष्णवीच्या मागे होती. तिने सुरुवातीला नियमित क्रमाने व त्यानंतर उलट क्रमाने अचूकपणे वस्तूंची नावे सांगितली. त्यानंतर पंचाने तिला मिश्र क्रमाने वस्तूंची नावे विचारली. वैष्णवीने त्यांना योग्य उत्तरे देऊन विक्रम केला.