शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाचे अडथळे दूर सारत १४१० ज्येष्ठांनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:11 IST

नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील गैरसोयींचे अडथळे दूर सारत मंगळवारी १४१० ज्येष्ठांनी लस घेतली. यात शहरातील ९५७, ...

नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील गैरसोयींचे अडथळे दूर सारत मंगळवारी १४१० ज्येष्ठांनी लस घेतली. यात शहरातील ९५७, तर ग्रामीणमधील ४५३ ज्येष्ठांचा समावेश आहे. ४५ वर्षांवरील गंभीर आजाराच्या लाभार्थ्यांनीही मंगळवारी लसीकरणासाठी गर्दी केली होती; परंतु ‘को-विन’ वेबसाईटमधील तांत्रिक बिघाडामुळे १२३ लाभार्थीच लस घेऊ शकले.

६० वर्षांवरील ज्येष्ठांच्या लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशीही प्रशासन सोयींना घेऊन गंभीर नसल्याचे चित्र होते. धक्कादायक म्हणजे, लसीकरणनंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली लाभार्थ्यांना अर्धा तास बसविण्याच्या प्रकारालाही काही केंद्राने हरताळ फसल्याचे दिसून आले; परंतु अशा सर्व अडथळ्यांवर मात करीत सोमवारच्या तुलनेत मंगळवारी दुपटीने ज्येष्ठांनी लस घेतली. शहरातील ११ केंद्रांपैकी सर्वाधिक लसीकरण मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयाच्या केंद्रावर झाले. २९३ लाभार्थ्यांनी लस घेतली. गंभीर आजाराच्या १४ लाभार्थ्यांनीसुद्धा याच केंद्रावर लस घेतली. या शिवाय, मेयो रुग्णालयाच्या ‘अ’ केंद्रावर १२२, ‘ब’ केंद्रावर ५९, एम्सच्या केंद्रावर १५६, डागा रुग्णालयाच्या केंद्रावर ४४, आयसोलेशन हॉस्पिटलच्या केंद्रावर २९, पाचपावली महिला हॉस्पिटलच्या ‘अ’ केंद्रावर २८, तर ‘ब’ केंद्रावर ३२, कामगार रुग्णालयाच्या केंद्रावर ४५, मेडिकलच्या ‘ए’ केंद्रावर ८४, ‘बी’ केंद्रावर ११८ लाभार्थ्यांनी लस घेतली. त्या तुलनेत लस घेतलेल्या गंभीर आजाराच्या लाभार्थ्यांची संख्या कमी राहिली. मेयोमध्ये २०, एम्समध्ये १०, डागामध्ये २, आयसोलेशनमध्ये ३, मेडिकलमध्ये १७ लाभार्थ्यांनी लस घेतली.

-खासगीला प्रतिसाद कमी

शहरातील तीन खासगी केंद्रांवर मंगळवारपासून लसीकरणाला सुरुवात झाली; परंतु शासकीय तुलनेत येथे कमी प्रतिसाद मिळला. मोगरे हॉस्पिटल केंद्रावर २२, लता मंगेशकर हॉस्पिटल केंद्रावर १४ तर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल केंद्रावर २९ ज्येष्ठांनी लस घेतली.

-ग्रामीणमध्ये ४५३ ज्येष्ठांचे लसीकरण

नागपूर ग्रामीणच्या १२ केंद्रांवर ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ४५३ आणि ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले व गंभीर आजार असलेल्या ५९ लाभार्थ्यांनी लस घेतली. काटोल ग्रामीण रुग्णालयात सर्वाधिक ११८ ज्येष्ठांचे लसीकरण झाले. उमरेड ग्रामीण रुग्णालयात ३८, पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात १, सावनेर उपजिल्हा रुग्णालयात ६८, भिवापूर ग्रामीण रुग्णालयात १४, रामटेक उपजिल्हा रुग्णालयात ५०, कामठी उपजिल्हा रुग्णालयात ३५, कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात २९, हिंगणा ग्रामीण रुग्णालयात ६२, मौदा ग्रामीण रुग्णालयात ४, तर नरखेड ग्रामीण रुग्णालयात ३४ लाभार्थ्यांनी लस घेतली. पारशिवनी, मौदा आणि कुही ग्रामीण रुग्णालय वगळता उर्वरित सर्व केंद्रांवर गंभीर आजाराच्या रुग्णांना लस देण्यात आली.

-आजपासून प्रत्येकी केंद्रावर १०० लाभार्थ्यांनाच टोकन

ज्येष्ठांची गर्दी कमी करण्यासाठी प्रत्येक शासकीय केंद्रावर १०० लाभार्थ्यांनाच लस देण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला. यामुळे बुधवारपासून १०० टोकन दिले जाईल. यामुळे केंद्रावर आता टोकन घेण्यासाठी गर्दी होईल. महापौर दयाशंकर तिवारी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केंद्रावर गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.

-आणखी दोन खासगी केंद्रांची पडणार भर

सीताबर्डी येथील लता मंगेशकर रुग्णालय, सक्करदरा येथील मोघरे चाईल्ड हॉस्पिटल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मंगळवारपासून लसीकरणाची सुरुवात झाली. बुधवारपासून आणखी दोन केंद्रांवर लसीकरण सुरू होणार आहे. यात सक्करदरा येथील गिल्लूरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तसेच रवीनगर येथे सेनगुप्ता रुग्णालयाचा समावेश आहे. येथे प्रति डोस २५० रुपये शुल्क भरून लस दिली जाणार आहे.